‘... आणि मग चाळीशी जवळ आलेल्या ह्या ‘नवीन’ पिढीला जेव्हा स्थैर्याची गरज भासू लागते तेव्हा त्यांचे पगार इतके वाढलेले असतात की संस्थेकरता ते फार महागडे झालेले असतात. इतर संस्थाही त्यांना एवढा पगार देऊ शकत नाहीत. अवास्तव पगारामुळे महागड्या सवयी लागलेल्या असतात. मोठी वाहनं, वाहनचालक, विमानप्रवास, परदेशी सहली, मोठमोठ्या क्लब्समध्ये सभासदत्व, महागड्या शाळा, कपडे, दागिने, घरं. मन आणि शरीर तडजोडीला तयार नसतं. स्वतःच्या अहंभावाशी तडजोड केली तरी घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं उतरवता येत नाही. आणि मग सुरु होते एक जीवघेणी धडपड ...’
‘मुक्त’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट देऊ शकता ...
संदीप खूप दिवसांनी एक चांगलं पुस्तक वाचायला मिळालं. तुझ्या पुस्तकात आताच्या पिढीची व्यथा मिळते. आपण कामाच्या ओघात वाहून जातो आणि मग त्याच गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरू लागतात. स्वतःला स्वतःच्या साच्यामध्ये ठेवणे अवघड होते आणि मग आपणच आपल्याशी प्रतारणा करू लागतो. पुस्तकं वाचताना मला स्वतःची स्टोरी वाचतोय असे वाटत होते. मी एकच शब्दात तुझ्या पुस्तकाविषयी बोलेन – खूप सुंदर. तुझ्यातला लपलेला कलाकार बाहेर आला.
संदीप फारच सुंदर. मला ही कादंबरी खूप आवडली. आमचीच गोष्ट वाटली. शून्यातून विश्व उभं करणाऱ्या मध्यमवर्गीय हुशार माणसाची कथा आणि व्यथा तू अचूक मांडली आहेस. आपल्या पिढीतील, जे घरच्यांचे पाठबळ नसताना नुसत्या हुशारीवर वर आले त्यांची ही गोष्ट आहे. ती मला खूप भावली.
आजच्या युगातील 'कर्मयोग्याची' वाटचाल व त्याच्या अवतीभवती घटणाऱ्या घटनांमधील गुंफण, कथेची उत्कंठा अगदी चढत्या क्रमाने वाढवत ठेवण्यात संदीप यशस्वी झाला आहेस. 'मुक्त' कादंबरीचा विषय व त्याची मांडणी मनाला भावून गेली. अप्रतिम पुस्तक !