विस्तव – भविष्याचा इतिहास
जानेवारी 24, 2021
मुखपृष्ठाविषयी थोडं:
चैनीच्या वस्तूंचे आम्हां वावडे नसते पण
उधळपट्टीवर अंकुश ठेवून असतो प्रत्येक जण
हेल्थ फॉसेट टाईल्स लावल्या बाथरूममध्ये जरी
नवीन घेतलेल्यावर जुना चिकटवतो साबण
अनेक गुणांपैकी हा गुणसुद्धा लक्षणीय
आम्ही मध्यमवर्गीय ॥
मी एक मध्यमवर्गीय आहे. माझ्या आजूबाजूलाही सर्वच जण मध्यमवर्गीय आहेत. मध्यमवर्गीयांच्या एका प्रचंड मोठ्या कळपाचा मी एक हिस्सा आहे. पण हा ‘मध्यमवर्गीय’ नावाचा प्राणी नक्की आहे तरी कसा? त्याचे गुणधर्म काय आहेत? त्याला काय आवडतं? तो कशाला घाबरतो? तो आपलं आयुष्य कसं जगतो? तो आयुष्याची इतिकर्तव्यता कशात मानतो? अशा अनेक प्रश्नाचा छडा लावायचा हा एक माफक प्रयत्न. मध्यमवर्गीय असणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे ‘अन्वेषण’ ह्या शब्दामुळे गांगरून जाऊ नका. कविता म्हटलं की दर वेळी काहीतरी भव्यदिव्य किंवा शब्दांच्या पलीकडलं असलं पाहिजे असा काही नियम नाही. तेव्हा ही आहे तुमची-आमची एक गाथा... दैनंदिन अनुभवांवर आधारित.
‘मध्यमवर्गीय – एक काव्यान्वेषण’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट देऊ शकता ...