महाशिवरात्र
डिसेंबर 17, 2021थोडं आणखीन ..
डिसेंबर 19, 2021होळी
होळीच्या खूप खूप शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/lVMC6IQ_cNM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फाल्गुन पूनम होळी म्हणजे रंगांचा वर्षाव
बहीण हिरण्यकश्यपूची होलिका तिचे ते नाव
तिच्यापासूनी प्रल्हादाचा विष्णू करी बचाव
होळी पेटवून स्मरण करविण्या सण हो हा साजरा ॥
हिंदू वर्षामध्ये येई शेवटचा सण होळी
पुरणाची अन् दूध तूप लावूनिया खावी पोळी
रंगपंचमीस चेहेऱ्यांवरती रंगांची रांगोळी
आप्तमित्र ह्यांच्या संगे हा सण होई साजरा ॥