logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
फिरदौस काश्मीर
जून 7, 2013
घर
ऑक्टोबर 16, 2015
इस्पितळाची वारी
जून 6, 2014
अपघाताप्रमाणे इस्पितळात भरती व्हावं लागणं हे केवळ इतरांच्या बाबतीत घडतं असा आपला समज असतो. इतरांना भेटायला आपण अनेकदा इस्पितळात जातो. मात्र इस्पितळ ह्या जागेचं गांभीर्य आपल्याला स्वतःला भरती होण्याची वेळ येते तेव्हाच समजतं. आणि त्यानंतर इस्पितळ ह्या वास्तूकडे आपण वेगळ्याच आदराने पाहू लागतो . . .

गप्पा मारणं, बसणं, भेटीला जाणं
फालतू विनोद सांगून परतून येणं
एखाद्या रात्रीला झोपायला जाणं
कधी सकाळ होते वाट पाहाणं

आत्तापर्यंत होती माझ्या विचारी
इतुक्यापुरती इस्पितळाची वारी || १ ||

जावे लागे रूग्णाच्या भेटीसाठी
नकळत चढते माझ्या कपाळी आठी
त्यातही रविवारी जर भेट ललाटी
येवोनी आवंढा गळ्याशी दाटी

पाहण्यापूर्वी पिक्चर रात्रीच्या पारी
उरकून घेर्इ इस्पितळाची वारी || २ ||

सुदॄढतेचा वर जणू मला मिळाला
सूपरमॅनचा चेला समजे स्वत:ला
साधेसुधे निमित्त झाले तापाला
रिपोर्टने झिणझिण्या आल्या डोक्याला

ऐसा कैसा इतुका पडलो आजारी
माझी पहिली इस्पितळाची वारी || ३ ||

इस्पितळी माझे कपडे तोकडे
आजूबाजू सारे चेहरे वाकडे
हाताच्या नळीला सलाइन जडे
गोळ्यांचा रतीब मुखात पडे

केले कोणी मजला चित मुंड्या चारी
आरंभली इस्पितळाची वारी || ४ ||

अन्नाावरची माझी गेली वासना
काहीच नीट ना वाटे मन्मना
भलभलते विकार जडले तना
वाढत चालला अशक्तपणा

काही खाता केवळ येर्इ ओकारी
वाढत जार्इ इस्पितळाची वारी || ५ ||

कोण कोण मजला भेटाया आले
कोणी कोणी काय विनोद केले
कोण तेथे रात्रीपुरते थांबले
कसलेही महत्व मनाला नुरले

केवळ वाटे केव्हा जातो माघारी
पुरे झाली इस्पितळाची वारी || ६ ||

फोटोत जायचा राहिलो खरा
डॉक्टरी यत्नांनी जाहलो बरा
जरी लागीयला उशीर जरा
आपुल्या पायांनी चाललो घरा

परतुनी आलो पुन्हा आपुल्या संसारी
पूर्ण झाली इस्पितळाची वारी || ७ ||

पाहून समजलो घरच्यांचे चेहरे
आप्तमित्र मदतीला ते खरे
त्यांच्यामुळे माझे संकट सरे
उपकारांनी माझे मन हे भरे

ठिकाणावर आली अक्कल सारी
उपयोगी इस्पितळाची वारी || ८ ||

आला प्रसंग ऐसा कोणावरती
झाला तुमचा कोणी स्नेही जर भरती
जावोनी मदत करावी पुरती
साधी कामेही महत्वाची ठरती

हल्ली माणसांची चणचण भारी
नेमे करा इस्पितळाची वारी || ९ ||

शेअर करा
66

आणखी असेच काही...

ऑक्टोबर 24, 2020

जगपंचायत


पुढे वाचा...
सप्टेंबर 2, 2016

अशीच एक इमारत


पुढे वाचा...
ऑक्टोबर 16, 2015

घर


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो