बेडकांची शाळा
नोव्हेंबर 14, 2021देव बसला वर ..
डिसेंबर 1, 2021सणावली
नूतनवर्षाभिनंदन! सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सणावली
नूतन वर्षारंभाची ती गुढी पाहा रोवली
सहस्रकांची संस्कृती भारतवर्षाची सावली
भाग्य आपुले थोर लाभते समृद्ध सणावली
प्रत्येक ऋतूमध्ये ऐसा सण होई साजरा ॥