logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
थोडा धीर धर
जुलै 1, 2011
जीवन
मार्च 21, 2014
योगायोग
मार्च 3, 2013
‘मी असा आहे’, ‘मी तशी आहे’ … अशा वल्गना करताना आपण सोयीस्करपणे विसरतो की आपण जसे आणि जिथे आहोत ते असणं आपल्या हातात कधीच नव्हतं, नसतं. त्याला उत्क्रांती म्हणा, प्राक्तन म्हणा किंवा देवाची करणी म्हणा, शेवटी आपलं असणं हा फक्त एक योगायोग आहे. काल संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त ही एक विज्ञानावर आधारित कविता …

कुठे सुखाचा ठेवा आहे अन् दु:खाचा भोग आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || धृ ||

सुयोग्य अंतर राखून फिरते सूर्याभवती अवनी
पोहोचत नाहीत उल्का कारण चंद्र वसतसे गगनी
गुंतागुंतीने प्रथिनांच्या सजीव बनले भुवनी

नको मला विज्ञान पुरेसा केवळ इतुका शोध आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || १ ||

एकच केवळ अंडाशय ते इतुक्या मोठ्या पोटी
एक जिंकला शुक्राणू अन् हरले कोटी कोटी
विजयाची तुमच्या सांगावी काय शक्यता होती

शक्यताऽशक्यतांचा ऐसा पिढ्यान्पिढ्यांचा ओघ आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || २ ||

आपल्या जन्मापूर्वी झाली स्वातंत्य्राची प्राप्ती
मुक्त समाजामध्ये वाढे भवितव्याची व्याप्ती
नसता विकल्प झाली नसती आकांक्षांची तॄप्ती

स्वतंत्रतेचा अमूल्य ठेवा वरदान हे अमोघ आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || ३ ||

जीवन संपविण्याच्यासाठी कारण पुरतं चिल्लर
दुषित पाणी वायू किंवा साला एक मच्छर
आरोग्याचे भोक्ते असाल कितीही तुम्ही कट्टर

पाहत तुमची वाट कुठेतरी बसला एक रोग आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || ४ ||

टायटॅनिकच्या प्रवाशांमध्ये आपलं नाव नाही
किल्लारीच्या भूकंपामध्ये आपलं गाव नाही
इतिहासातील युद्धांमध्ये आपणा ठाव नाही

अज्ञानाच्या अंधारातच आयुष्याचा मोद आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || ५ ||

झाड पडे कधी रस्त्यावरती त्याच्याखाली मरता
कुणी मद्यपी गाडी चालवे त्याचेही बळी ठरता
साध्या अपघातांनीसुद्धा मरणापुढती हरता

प्राक्तनातला लेखा आपल्याकरिता तरी अबोध आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || ६ ||

नेते असतात ठाम देश माझ्यामुळेच घडला
साधू असतात ठाम पाऊस माझ्यामुळेच पडला
श्रेय भविष्याचे घेण्याचा छंदच सर्वां जडला

तुम्ही आम्ही बैल नियती सर्वांची प्रतोद आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || ७ ||

कुठे सुखाचा ठेवा आहे अन् दु:खाचा भोग आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे || धृ ||

काही अभिप्राय

  • अभिजित दाते
    खूपच भारी दोस्ता,,, एकदम सही... एका practical माणसाने केलेली कविता वाटते.
    अभिजित दाते
    ०१.०३.२०१३
शेअर करा
115

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो