logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
अंकायन
फेब्रुवारी 4, 2011
शून्य
फेब्रुवारी 4, 2011
नगण्य
फेब्रुवारी 4, 2011
मी, मला, माझं, माझ्यामुळे, माझ्यासाठी, माझ्यावर, माझ्याकरता … मनुष्याच्या अहंभावाला काही सीमा नाही. जिथे न फिरणारा भोवरा आधाराशिवाय जमिनीवर उभा राहील एवढ्या सूक्ष्म शक्यतेवर सारी जीवसृष्टी टिकून आहे, तिथे त्या जीवसृष्टीचा एक हिस्सा असलेल्या मानवजातीचा काय पाड! ब्रह्मांडाच्या विस्तारापुढे आपण किती कःपदार्थ आहोत ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर ह्या अहंभावामुळे निर्माण झालेले कित्येक प्रश्न सुटू शकतील ह्याबाबत कुणाला शंका राहणार नाही एवढं नक्की!

वर्षं झाली तेरा अब्ज आणि सत्तर कोटी
इतक्या पूर्वीपासून सॄष्टी अस्तित्वात होती
केवळ दोन लक्ष वर्षांपूर्वी अवतरलास
आहे तुझी कारकीर्द ह्मा भूतलावर छोटी

फार पूर्वी सुटला आहे समयाचा तो बाण
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || १ ||

अब्ज अब्ज मंडलांपैकी आकाशगंगा एक
त्यातल्या अब्जो ताऱ्यांपैकी सूर्य आपला एक
सूर्याच्याही तीन लक्षांश आहे पॄथ्वी ग्रह
त्या ग्रहाच्या विस्तारावर केवळ कण तू एक

सॄष्टीच्या आकारापुढती कस्पट तुझे प्रमाण
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || २ ||

पॄथ्वीच्या इतिहासामध्ये असंख्य प्राणीजाती
अव्याहत ते जैविक चक्र सतत येती जाती
तुझ्यानंतर अजून कोणी आलं नाही नवीन
तुझ्याआधीच्या कित्येकांची होऊन गेली माती

विश्वाच्या वटवॄक्षावरचं शेंडेफळ तू लहान
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || ३ ||

विज्ञानाची गाठली आहेस तुझ्या मते परिसीमा
पुराव्यास ती दिसती नागासाकी हिरोशिमा
एका ज्वालामुखीत ताकद असते सहस्रपट
धूमकेतूची टक्कर नष्ट करेल यशाची गरिमा

निसर्गाला देशी आव्हान आणून उसनं अवसान
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || ४ ||

विज्ञानाच्या यशामुळे तुज चढला रे उन्माद
खेळ खेळता निसर्गाशी होशील पण तू बाद
तू गेलास तर जगताला ह्मा फरक पडणार नाही
नुकसान होर्इल तुझंच ह्मावर करू नको तू वाद

तुझ्याबरोबर संपून जार्इल सारं ते विज्ञान
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || ५ ||

सॄष्टीच्या अपत्यांपैकी सर्वात लाडका तू
पण तरीही बनलायस सॄष्टीकरता मोठा धोका तू
अर्थ लावण्या सॄष्टीचा ह्मा निवड झाली रे तुझी
होशील जगज्जेता ठेवशील संयम जर का तू

सॄष्टीच्या ह्मा विश्वासाचा ठेव जरासा मान
भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण || ६ ||

शेअर करा
23

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो