logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
योगायोग
मार्च 3, 2013
किती सूक्ष्म किती भव्य
सप्टेंबर 19, 2014
जीवन
मार्च 21, 2014
दर वर्षी २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा होतो. आपल्यापैकी कोणी पाण्याचं महत्व न समजण्याइतके अनभिज्ञ नसावेत. जलदिनानिमित्त ह्या अनन्यसाधारण जीवनस्रोताचं महत्व अधोरेखित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . . .

नाही त्याला रंग तरीही डोळ्यां भासे छान
नाही त्याला चव तरीही जिभेस लागे छान
एक ऑक्सिजन जोडीला अन् दोन हायड्रोजन
जीवसॄष्टीच्या खजिन्यामधले सर्वात अमूल्य धन

जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोठा त्याला भाव
त्याला जीवन ऐसे नाव || १ ||

फार तापलं जर का तर ते भाजून काढू शकतं
अती गोठलं जर का तर ते थिजवून टाकू शकतं
वाचवेल ते तुम्हास जर का कुठे लागली आग
बुडवून टाकू शकेल जर का आला त्याला राग

प्रकोप त्याचा झाला असता होते धावाधाव
त्याला जीवन ऐसे नाव || २ ||

बटाट्यामध्ये ऐशी टक्के भरून तेच तर असतं
टॉमेटोत तर पाचच टक्के बाकी काही असतं
शरीरं तुमची आमची जरीही दिसती घनरूप वरून
पण शरीरामध्ये दोन तॄतियांश तेच असतं भरून

काढलं ते जर आपल्यामधून राहील काय बचाव
त्याला जीवन ऐसे नाव || ३ ||

त्याच्यासारखे रासायनिक पदार्थ आहेत न्यारे
पण पृथ्वीवरच्या तापमानास वाफ होती सारे
फक्त त्याचा घन विरळ द्रवापेक्षा असतो
म्हणूनच बर्फ पाहा नेहेमी पाण्यावर तरंगतो

इतर सार्‍यांपेक्षा त्याचा आहे भिन्न स्वभाव
त्याला जीवन ऐसे नाव || ४ ||

तेरा अब्ज परार्ध लिटर पॄथ्वीवर ते राही
पण त्याच्यापैकी तीनच टक्के समुद्रांत नाही
तीन टक्क्यांपैकी फक्त एक शतांश आपलं
बाकी सारं धृवांवरच्या बर्फामध्ये लपलं

ह्मात आले नदी नाले आणि सर्व तलाव
त्याला जीवन ऐसे नाव || ५ ||

सांडपाणी अन् कारखान्यांनी दूषित होर्इ भरभर
नळ सोडून ठेवण्याआधी विचार क्षणभर कर
महत्व त्याचे किती आहे ते सांगू न लागे सूज्ञा
अज्ञानाने करू नको तू अतिपरिचयात अवज्ञा

आहे त्याला जपून ठेवणे नाही दुसरा वाव
त्याला जीवन ऐसे नाव || ६ ||

शेअर करा
56

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो