logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
जीवन
मार्च 21, 2014
काळजी घे
एप्रिल 4, 2016
किती सूक्ष्म किती भव्य
सप्टेंबर 19, 2014
विज्ञानाची अलौकिक भरारी दोन दिशांना गवसणी घालत चालली आहे. एक दिशा आहे अतिसुक्ष्माची तर दुसरी आहे अतिभव्याची. एका टोकाला अतिसूक्ष्म कणांच्या प्रक्रिया तर दुसऱ्या टोकाला ब्रह्मांडाची व्याप्ती! ब्रह्मांडाच्या साऱ्या गुपितांचा छडा लावल्याशिवाय हे शास्त्रज्ञ थांबणार नाहीत . . .

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/St0nGb9wSGQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.

कधी सूक्ष्मदर्शकातून दिसे कधी दुर्बिणीचा वापर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || धृ ||

मांजर कुतरा उंदीर खारी काऊ चिऊ अन् मुंगी
अश्व उंट अन् जिराफ हत्ती मासे कितीतरी जंगी
लहानमोठ्या किती जीवांचा सभोवती वावर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || १ ||

मीठ स्फटिक अन् परागकण त्याहून छोटी ती पेशी
सह्माद्री विन्ध्याहून उंच हिमालय माझ्या देशी
कणकणांचा पर्वत अन् थेंबांचा तो सागर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || २ ||

पाण्याच्या रेणूत चिमुकला हायड्रोजनचा अणू
चंद्र पॄथ्वीहून विशाल सविता तीन पिढ्या त्या जणू
अणू दिसे ना कुणा कुणी ना गेले सूर्यावर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || ३ ||

अणूच्या केंद्राभवती फिरतो इलेक्ट्रॉन किती सान
सूर्यमालेस कोते आकाशगंगेमध्ये स्थान
प्रयोगांती ना शंका उरते त्यांच्या शोधावर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || ४ ||

प्लँकच्या स्थिरांकानंतर काहीच उरे ना छोटे
ब्रह्मांडाच्या व्याप्तीपुढे काहीच असे ना मोठे
वैज्ञानिक करती सॄष्टीचे गुपित असे सादर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || ५ ||

कधी सूक्ष्मदर्शकातून दिसे कधी दुर्बिणीचा वापर
किती सूक्ष्म हे चराचर
किती भव्य हे चराचर || धृ ||

शेअर करा
133

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित


पुढे वाचा...

4 Comments

  1. संसारे म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 25, 2019 येथे 7:00 PM

    कवितांचा आशय सुरेख आहे.

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 26, 2019 येथे 1:52 PM

      मनःपूर्वक धन्यवाद.

      उत्तर
  2. संसारे म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 25, 2019 येथे 6:59 PM

    कवितांचा आशय फारच सुरेख आहे.

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 26, 2019 येथे 1:51 PM

      मनःपूर्वक धन्यवाद.

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो