logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
नाव
मार्च 31, 2018
माझाच देव महान
जानेवारी 17, 2021
आयुष्याचं गणित
डिसेंबर 22, 2018
राष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छा! बोटं वापरून आकडेमोड करणाऱ्या प्राचीन मानवापासून ते आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्या गणिताच्या मेरुमणी रामानुजनपर्यंत मानवाने प्रचंड मजल मारली आहे. आपल्यासारख्या सामान्य जनांना रामानुजन ह्यांची गणिती प्रमेय कदाचित समजणार नाहीत पण गणित हा विषय मात्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ह्यात शंका नाही.

बाळाच्या जन्माची बातमी
ऐकतच राहिलो
नर्स म्हणाली मुलगा वजन
साडेतीन किलो

किलो साडेतीन म्हणजे
पाउंड पावणे आठ
आजीला हे समजावताना
लागली माझी वाट

जन्मापासून बाळाच्या त्या सुरू होतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ १ ॥

तक्त्यावर बाराखडीच्या
खाली होते आकडे
तेव्हापासून आले होते
तुमचे त्यांचे वाकडे

भागाकार गुणाकार आणि
वजाबाकी बेरीज
आयुष्य सुंदर झालं नसतं
का हो ह्यांच्याखेरीज

शाळेमध्ये उगीच मार खायला लावतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ २ ॥

पहिली दुसरी तिसरी चौथी
पाचवी आणि सहावी
आकडेमोड करता करता
आली पाहा दहावी

एसेसीला अभ्यास करणं
एकच होतं मिशन
नव्वद टक्के मिळूनदेखील
हुकलीच ॲडमिशन

स्पर्धेमध्ये आपली जागा दाखवून देतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ३ ॥

शिक्षण संपलं वाटलं आपलं
गणित आता संपलं
आयुष्याने प्रत्येक वेळी
गणितालाच पण जुंपलं

पगाराच्या गणितात चालत
नाही जरा हयगय
गणितच तुम्हा सांगतं झालंय
लग्न करायचं वय

लग्नाआधी पैशाचं सोडवावं लागतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ४ ॥

लग्नानंतर ह्या गणिताला
खरा येतो बहर
मिळकत राहते तेवढीच
आणि खर्च करतो कहर

मुलं झाली की गणिताचा
माजतो हाहाकार
खर्चामधली बेरीज संपते
लागतो गुणाकार

अती झालं तर कर्जाच्या वाटेने नेतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ५ ॥

सोडवत बसलो गणित नाही
विचार केला अन्य
आयुष्याच्या जमाखर्चात
बाकी राहिली शून्य

गणितापायी वर्षं झाली
आयुष्यातून वजा
गणितापायी घेतला नाही
आयुष्याचा मजा

माझ्यासाठी काहीच शिल्लक ठेवत नव्हतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ६ ॥

आज सकाळी मित्र माझा
परलोकाला गेला
बरंच वय होतं सुटले
मुलगा बोलून गेला

विचार मुलाचे ऐकून आता
वाटे मजला भय
माझ्यापेक्षा कमी होतं
मित्राचं त्या वय

निवॄत्तीनंतर वयाचं नुसतं राहतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ७ ॥

मग म्हणालो भीती कसली
डोळे उघडून बघ
दुसऱ्यांसाठी खूप जगलास
स्वत:साठी जग

कोण सांगू शकेल आपलं
आयुष्य बाकी किती
आयुष्य आहे ओंजळ वाळू
होते भरभर रिती

माझ्यापुरतं आयुष्याचं सुटलं होतं गणित
आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥ ८ ॥

शेअर करा
52

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
मार्च 31, 2018

नाव


पुढे वाचा...

2 Comments

  1. Radhika Durve म्हणतो आहे:
    डिसेंबर 23, 2018 येथे 8:47 AM

    खूपच सुंदर लिहीले आहे.

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      जानेवारी 9, 2019 येथे 3:17 PM

      मनःपूर्वक धन्यवाद…

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो