logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
क्रिकेट आणि युद्ध
फेब्रुवारी 12, 2011
आळस
मे 6, 2011
वर्ष २०००
एप्रिल 1, 2011
भारताने क्रिकेट विश्वचषकात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आज १९८३च्या विश्वचषकाची आठवण येणं साहजिक आहे. त्या ऐतिहासिक गोष्टीला आता तब्बल २८ वर्ष होऊन गेली आहेत. मनात सहज एक विचार आला, काय करत होतो आपण २८ वर्षांपूर्वी? त्या विचारांनीच रूप घेतलं ह्या ‘वर्ष २०००’ कवितेचं. पाहा पटतेय का.

दिवस महिना पुढे आणि वर्ष त्याच्या मागे
शाळेमध्ये तारीख अशी रोज लिहावी लागे
एकदा तारीख लिहिताना शंका मनात आली
कशी लिहू तारीख आपण दोन हजार साली
शून्य आकडा तारखेमध्ये कसा हो लिहिणार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || १ ||

दोन हजार साली आपण गाठली असेल तिशी
गालांवरती दाढी असेल ओठांवरती मिशी
अभ्यास नाही शाळा नाही आभाळ सारं खुलं
पण लग्न झालं असेल आपलं आणि असतील मुलं
नुसत्या कल्पनांनीसुद्धा लाजून जायचो पार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || २ ||

शीतयुद्ध सुरू होतं सारे होते कृद्ध
नक्कीच सुरू होणार होतं तिसरं महायुद्ध
चढली होती सर्वांनाच विज्ञानाची मस्ती
करणार होता मानव लवकर चंद्रावरती वस्ती
जगामध्ये काय चाललंय होतो बेदरकार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || ३ ||

दोन हजार साली संपणार होतं खनिज तेल
बैलगाड्या वापरण्याची येणार होती वेळ
गरिबी संपून जाणार, होता सरकारी आवेश
एकवीसाव्या शतकामध्ये जाणार होता देश
माझं घेणं देणं नव्हतं ह्मा साऱ्याशी फार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || ४ ||

काय आणील भीषण वाताहात वाय टू के
भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका एक चुके
प्रत्येक घरी येणार होते कॉम्प्युटर अन् फोन
गाड्या सुंदर येणार होत्या घरटी दोन दोन
देशात तेव्हा कॉम्प्युटर होते मोजून चार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || ५ ||

समय पुढे सरकत जातो नाही नियंत्रण
दूर दूर दिसणारेही जवळ येतात क्षण
हा हा म्हणता उलटून गेलं दुसरं सहस्त्रक
तिसर्‍यामधील बघता बघता गेलं एक दशक
आता हसू येतं जेव्हा करतो मी विचार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार || ६ ||

खरंच होते का हो तेव्हा साधे सर्वजण
जगच होतं निरागस का होतं माझं मन
चंद्र झोपत होता लिंबोणीच्या झाडामागे
भोलानाथसुद्धा सारं खरं खरं सांगे
चॉकलेटच्या बंगल्याला होतं टॉफीचं दार
बरं होतं दूर होतं वर्ष दोन हजार || ७ ||

शेअर करा
80

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो