logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
जबाबदारी
ऑगस्ट 2, 2013
उपरा
सप्टेंबर 20, 2013
मिच्छामी दुक्कडम
सप्टेंबर 6, 2013
माझे काही जैन मित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांना भेटून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणतात. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात माझ्या हातून घडलेल्या प्रमादांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजपासून आपल्या नात्यामध्ये फक्त सौहार्दाच्या आठवणी असू द्यात. पद्धत आवडली आणि म्हणून माझ्या सर्व आप्त-मित्र-सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीचा योग साधून म्हणतो …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uH_R9uY_rEU ह्या ठिकाणी ऐकता येईल.

क्षमा करावी सर्व चुकांची विसरूनिया अहम्
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || धृ ||

ऑफिसमधील तणाव म्हणजे असतं समरांगण
खालच्यांवर अरेरावी करूनी वरच्यांशी भांडण
आज मात्र विसरा प्रमादास विसरूनी सर्व नियम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || १ ||

तणाव ऑफिसमधले घरातसुद्धा झिरपत जाती
शब्द वाकडा बोलून जातो विसरून सारी नाती
स्पष्ट क्षमा ही पत्नी मुलांची बोल नाही मोघम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || २ ||

मातपित्यांना चिंता वाटे किती झालो जरी मोठा
वेळ मोकळा खात जात असे वॄद्ध वयाने होता
सुटला असेल माझा बोलत असताना संयम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ३ ||

आयुष्यात मिळाले मजला मित्र जीवाभावाचे
संगतीमध्ये ज्यांच्या विरले क्लेशही तणावाचे
चुकून कधी जर झाली असली त्यांच्या मना जखम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ४ ||

दिनक्रमात ह्मा धकाधकीच्या किती व्यक्ती भेटती
खटके उडूनी कितीक त्यातील रागाने बोलती
शब्दाने वाढतो शब्द हो वातावरण गरम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ५ ||

क्षमायाचना नसे प्रमादाचा पुढच्या परवाना
माझ्यातील दोषांची मजला जाणीव आहे जाणा
जाणीव असणे सुधारण्याची पायरी ही प्रथम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ६ ||

क्षमा करावी सर्व चुकांची विसरूनिया अहम्
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || धृ ||

शेअर करा
79

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो