logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
वीकएंड
जून 19, 2015
युधिष्ठीर आणि दुर्योधन
ऑगस्ट 7, 2015
मत्सर
जुलै 17, 2015
अमेरिकेतील एका संशोधनानुसार सामाजिक माध्यमांवर (social media) अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारच्या न्यूनगंडाची बाधा होते. सामाजिक माध्यमांवरील ओळखीच्या इतर सर्व व्यक्ती पराकोटीच्या सुखात नांदत आहेत असं चित्र त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ती व्यक्ती स्वतःसुद्धा इतरांना तसंच भासवायचा प्रयत्न करत असली तरी कुठेतरी मनात स्वतःबद्दल कमीपणा बळावू लागतो. तुमच्या बाबतीत असं घडतं का?

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/4YG0m3GMx24 ह्या ठिकाणी ऐकता येईल.

त्या कुणाला आप्तमित्रांच्या मॄत्यूचा शोक नसतो
कारण कुणी मुळात आजारीच पडत नाही
सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जुलाब नाही
कावीळ नाही नागीण नाही कॅन्सर नाही एडस् नाही

प्रत्येक जण सुसंस्कृत कुणी अपशब्द वापरत नाहीत
बायकोला मारणं सोडा साधं तिच्याशी भांडतही नाहीत
आर्इवडिलांची सेवा करतात मुलांचे पापे घेतात
सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात

प्रत्येक जण धर्मपराङण … धर्माभिमानी
त्यांना प्रत्येक सण ठाऊक असतो
मग प्रत्येक सणाला एकमेकांना शुभेच्छा देतात … पारंपरिक वेष परिधान करून

प्रत्येक जण देशभक्त … राष्ट्राभिमानी
पाकिस्तानच्या नावाने खडे फोडतात
सीमेवर लढणा­ऱ्या सैनिकांकरता अश्रू ढाळतात
प्रजासत्ताक आणि स्वातंत्य्रदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करतात

प्रत्येक जण माणुसकीने ओतप्रोत भरलेला
कुणाला कुणाची दुखणी पाहवत नाहीत
हरवलेल्या बालकांना शोधण्याकरता तत्पर असतात
रक्तदानाकरता आवाहानं करतात

प्रत्येक जण सुसंपन्न
नवनवीन गाड्या घेतात परदेशवाऱ्या करतात
त्यांची मुलं परखंडातील विश्वविद्यालयांमध्ये लीलया प्रवेश मिळवतात

मिळवोत करोत जावोत घेवोत असोत ढाळोत फोडोत … मला त्यांचा हेवा का वाटावा?
होतं माझं माझ्या बायकोशी भांडण … ह्माला ते जबाबदार आहेत का?
नसेल मला परदेशवारी परवडत … ह्मात त्यांचा काय दोष?
असतील माझी मुलं द्वाड … ही काय त्यांची चूक?
नसेल माझं कुटुंब त्यांच्याइतकं सुखी … ह्मात त्यांनी काय करावं?

आणि माझा स्वभाव जर इतका मत्सरी असेल
तर मी बंद का नाही करत …
फेसबुक पाहणं?!

शेअर करा
16

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो