logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
निवडक दृष्टी
जुलै 20, 2012
इन द लाँग रन…
ऑक्टोबर 5, 2012
बातम्या
सप्टेंबर 21, 2012
काल सकाळी नेहमीच्या सवयीने मी वर्तमानपत्र वाचायला घेतलं. बराच वेळ वाचल्यानंतर कधीतरी माझ्या लक्षात आलं की ते तीन दिवसांपूर्वीचं वर्तमानपत्र होतं. आपल्यापैकी कित्येकांना वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस सुरु झाला आहे असं वाटत नाही पण मला आता संशय येऊ लागला आहे की आपण तारीख बदलून रोज एकच वर्तमानपत्र तर वाचत नाही ना! वानगीदाखल ह्या ‘बातम्या’ वाचा…

वाढली महागाई
किंमत वर जाई
बाप जेवला तर
उपास करते आई || १ ||

आई एक होती
मुलगी तिजला छोटी
मुलगा नाही म्हणून
हसू नाही ओठी || २ ||

ओठी धरली विडी
शिलगावायला काडी
चढण्याकरता सोय
यमसदनाची शिडी || ३ ||

शिडी आणि साप
परीक्षेचा व्याप
मुलं करतात मजा
टेंशन घेतो बाप || ४ ||

बाप झाला बेटा
बेटाही अभिनेता
दोघांच्या जोडीला
सिनेमात मग भेटा || ५ ||

भेटायाला येती
पाहुणचार घेती
पाकिस्तानी दूत
डोकेदुखी देती || ६ ||

देती ते उपदेश
भरपूर दाढी केश
कामं करती काळी
अंगी साधूचा वेष || ७ ||

वेष होता साधा
तयार पण अपराधा
रोखेल कैसे कोणी
सांगा दहशतवादा || ८ ||

वादावादी अहा
खाल्ल्या खाणी दहा
नैतिकतेचे वक्ते
सारे पक्ष पाहा || ९ ||

पाहा काय तो खेळ
खेळाडूंची भेळ
रोजच्या रोज पाहायला
असतो कोणा वेळ || १० ||

वेळ काय हो आली
मुलगी मुलीस म्हणाली
तुझ्याच नावाचे मी
कुंकू लावीन भाळी || ११ ||

भाळी लिहिली खाशी
प्रथमग्रासात माशी
प्रत्येकाचे प्राक्तन
सांगून जाती राशी || १२ ||

राशी त्या गोदामी
धान्याच्या कुचकामी
किमती वाढवण्याची
युक्ती आहे नामी || १३ ||

नामी आपुल्या करा
गाडी आणिक घरा
कर्ज देतो आम्ही
करून यावे त्वरा || १४ ||

त्वरा करा तुम्ही आता
शेअर्स वर जाता
पैसे लावाल तर
नाहीतर नुसत्या बाता || १५ ||

बाता नको फक्त
कमी असेल वक्त
एड्स किती बोकाळे
तपासून घ्या रक्त || १६ ||

रक्त कुणी तो काढे
कुणी कुणाला पाडे
कुठे कुठे भांडणे
कुठे होती अन् राडे || १७ ||

राड्यांतुन त्या बळे
कसे काय ना कळे
मीठ मिरची लावून
बनती मग ते मथळे || १८ ||

मथळे ते सारखेच
पडतो मजला पेच
तारीख बदलत जाते
छापत असतात तेच || १९ ||

तेच तेच वाचून
उबग येई साचून
तरीही करमत नाही
पेपराच्या वाचून || २० ||

शेअर करा
6

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

2 Comments

  1. Radhika Durve म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 2, 2019 येथे 4:50 PM

    अतिशय सुंदर

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 8, 2019 येथे 12:17 PM

      धन्यवाद…

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो