मॉर्निंग वॉक
ऑक्टोबर 4, 2013प्रमोशन
जानेवारी 17, 2014परतफेड
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये छेड काढण्याचा मक्ता पुरुषांनी घेतला आहे. मात्र हे असं कुठपर्यंत चालणार? दिवसेदिवस सबल होणाऱ्या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या ह्या फाजीलपणाची परतफेड करावीशी वाटत नाही का?
दिसतो जसा चित्रपटातील नट
त्याच्या गोर्या भाळी उतरलेली वात्रट
बोटाने मागे सारावी ती बट
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || १ ||
समोरच्या खिडकीकडे माझं सारं लक्ष
तो उभा असतो खात कधी सफरचंद कधी द्राक्ष
टाकेल का इथे एखादा कटाक्ष
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || २ ||
कधी असंच त्याने माझ्या घरी यावं
गालात हसत मला काहीतरी विचारावं
मी अबोधपणे त्याच्या सहवासातच हरवावं
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ३ ||
बसमध्ये चढताना तो दिसावा
बाकी कुठेही बसण्यास वाव नसावा
माझ्या शेजारीच येऊन बसावा
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ४ ||
कॉलेजला जायची त्याची माझी एकच वाट
वाटेत मध्येच झाडी घनदाट
दचकून त्याने मध्येच धरावा माझा हात
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ५ ||
एकटा घरी जात असावा तो पावसाळी रात्री
त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे असावी छत्री
चिंब त्याची काया धुंद माझ्या गात्री
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ६ ||
सांगायचंय मला काही त्याच्या कानात
रोज जातो ह्माच वाटेने दुकानात
आज गाठीन त्याला नक्की आडरानात
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ७ ||
खुरट्या दाढीने भरलेले त्याचे गाल
मस्त मर्दानी त्याची रूबाबदार चाल
काय साला मस्त आहे माल
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ८ ||
दोघांना असतं एकमेकांचं वेड
मग वात्रटपणाची करण्याकरता सव्याज परतफेड
आपणही काढावी मुलांची छेड
असं मुलींना कधीच वाटत नाही का? || ९ ||