logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
तारीख
नोव्हेंबर 4, 2011
बातम्या
सप्टेंबर 21, 2012
निवडक दृष्टी
जुलै 20, 2012
मी आणि माझा एक भारतभेटीस आलेला परदेशस्थित मित्र गप्पा मारत उभे होतो. काही वेळाने त्याचा अस्वस्थपणा माझ्या लक्षात आला. आमच्या शेजारीच एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा आशाळभूतपणे भिक मागत उभा होता. खरं तर तो आम्हा दोघांपासून सारख्याच अंतरावर उभा होता पण मला तो दिसलाच नव्हता. म्हणजे दिसला होता … पण त्याचं असणं मला जाणवलंच नव्हतं. भारतातील आणि विशेषतः मुंबईसारख्या महानगरातील इतरही मध्यमवर्गीय नागरिकांना माझ्यासारखीच निवडक दृष्टीची दैवी देणगी प्राप्त झाली आहे का?

पुकारला विजेने संप
हातापाया सुटे माझ्या कंप
शेतकऱ्याचा थांबला पंप
मला कधीच दिसला नाही || १ ||

ट्रॅफिकची रोजची कटकट
गाडीची गाडीशी घसट
ती लोकलमधली घुसमट
मला कधीच दिसली नाही || २ ||

कुर्म्याला तेल आहे फार
बिर्याणी होती थोडी गार
झोपडपट्टीतील उपासमार
मला कधीच दिसली नाही || ३ ||

औषधांची वाढे महागार्इ
इन्श्युरन्ससुद्धा मिळत नाही
ती गावाकडची रोगरार्इ
मला कधीच दिसली नाही || ४ ||

घरकुल आहे माझं छान
स्वच्छतेचा मला अभिमान
रस्त्यावरची पडलेली घाण
मला कधीच दिसली नाही || ५ ||

आॅफिस माझं स्वच्छ विलक्षण
घरात एसी तेच भूषण
ते शहरातील प्रदूषण
मला कधीच दिसलं नाही || ६ ||

हाॅटेलाची सारखी वारी
कपडेलत्तेसुद्धा माझे भारी
समोरचा जर्जर भिकारी
मला कधीच दिसला नाही || ७ ||

दर मासी मिळतो पगार
आमचा निटनेटका संसार
बोकाळला भवती भ्रष्टाचार
मला कधीच दिसला नाही || ८ ||

उच्च शिक्षणाचा चढे ज्वर
देश झाला आता अग्रेसर
झोपडीतील गरीब निरक्षर
मला कधीच दिसला नाही || ९ ||

निवडक आहे माझी दॄष्टी
दिसतात फक्त छान गोष्टी
दॄष्टीआडची कुरूप ती सॄष्टी
मला कधीच दिसली नाही || १० ||

जगणं माझं आहे भाकड
दोन्ही डोळ्यां लावून झापड
सुधारणेची मोठी ती निकड
मला कधीच दिसली नाही || ११ ||

शेअर करा
2

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो