logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
आरसा
ऑगस्ट 15, 2014
नकोशी तारीख
डिसेंबर 5, 2014
जिंकणाऱ्यांची दुनिया
सप्टेंबर 5, 2014
शर्यतीत मागे पडलेले खेळाडू, सिनेमात हिरो-हिरोइनच्या मागे नाचणारे एक्स्ट्रा, ६०% गुण मिळवून पास होणारे विद्यार्थी ह्या सर्वांमध्ये एक समान दुवा असतो. जगाने ह्या साऱ्यांच्या माथी ‘अयशस्वी’ किंवा ‘हरलेले’ असा शिक्का मारलेला असतो. गम्मत म्हणजे अशा हरलेल्यांची संख्या जिंकलेल्यांपेक्षा कितीतरी अधिक असते आणि तरीही आपण ह्या जगात जगायला नालायक आहोत असा न्यूनगंड मनात जोपासत हे हरलेले जगत असतात. काहीतरी नक्की चुकतंय . . .

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/aQ_vMM8YQa4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.

आयुष्यामध्ये कुचकामी ठरणार्‍यांनी काय करावं
जिंकणार्‍यांच्या दुनियेमध्ये हरणार्‍यांनी काय करावं ||

पाचही बोटं सारखी नसतात शाळेमध्ये शिकवलं जातं
स्कॉलर्सपुढे साठ टक्के मिळणार्‍यांनी काय करावं ||

माझा मुलगा आयडॉल व्हावा प्रत्येकाचं स्वप्न असतं
स्टेजवर पाचावर धारण बसणार्‍यांनी काय करावं ||

खेळ म्हणजे युद्ध नाही ज्यात सारं क्षम्य असतं
खेळभावना मनामध्ये  जोपासणार्‍यांनी काय करावं ||

प्रत्येक स्पर्धेमध्ये केवळ एकच पहिला येत असतो
तेवढीच मेहनत करून दुसरं येणार्‍यांनी काय करावं ||

प्रत्येकाला शक्य नसतं बनणं येथे करोडपती मग
फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये चुकणार्‍यांनी काय करावं ||

तुम्हास त्यांची आहे तेवढी त्यांना तुमची गरज नाही
पदोन्नतीच्या चाळणीमधून गळणार्‍यांनी काय करावं ||

शंभरातला एक यशस्वी धंद्याचं हे गणित साधं
नव्व्याण्णव त्या बाकी सार्‍या बुडणार्‍यांनी काय करावं ||

दुसर्‍याला मारूनच येथे पोट भरत असेल तर
हिंस्र पशूंच्या जंगलामथ्ये चरणार्‍यांनी काय करावं ||

यश कसे मिळवावे हे तर असंख्य तोंडी ऐकत असतो
हलाहल अपयशाचे रोज पचवणार्‍यांनी काय करावं ||

जिंकणार्‍यांच्या इतकीच आहे हरणार्‍यांची ही दुनिया
जेत्यांकडून तुच्छता तरीही झेलणार्‍यांनी काय करावं ||

आयुष्यामध्ये कुचकामी ठरणार्‍यांनी काय करावं
जिंकणार्‍यांच्या दुनियेमध्ये हरणार्‍यांची काय करावं ||

शेअर करा
18

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो