logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
मनाने चांगला
मे 16, 2014
आरसा
ऑगस्ट 15, 2014
क्षितीज
ऑगस्ट 1, 2014
‘अमुक एवढी’ गोष्ट झाली की मी निवृत्त होणार’ असं आपल्यातील प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्यक्षात मात्र कोणीही निवृत्त होताना दिसत नाही कारण ती ‘अमुक एवढी’ गोष्ट एखाद्या क्षितीजाप्रमाणे असते. आपण क्षितीज म्हणून ठरवलेल्या जागी पुढचं क्षितीज तयार असतं . . .

लहान होतो आयुष्य म्हणजे खेळच होता सारा
पिता म्हणाला दाखवत मजला दूरचा तो तारा
ते बघ तुझे लक्ष्य विचार वाटला भलताच न्यारा

धावण्याकरता केवळ ते एक बीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं || १ ||

क्षितीज गाठलं बघता बघता पूर्ण केलं शिक्षण
तेव्हा कळलं अजून पुढचं क्षितीज होतं धन
चालत सुटलो त्या क्षितिजाला लावून तन अन् मन

मेहनतीचं माझ्या व्हायला चीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं || २ ||

धनाच्या क्षितिजावर जाता दिसला चमत्कार
एकाच वेळी अनेक क्षितिजे घडे साक्षात्कार
गाडी बंगला क्षितिजांचे त्या असंख्य ते आकार

उत्तर प्रत्येक गणिताचं पण बेरीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं || ३ ||

क्षितिजावरच्या जागांचं त्या तंत्र न्यारं मोठं
जागा सर केल्या तरीही क्षितीज सरकत होतं
नवीन क्षितिजापर्यंतचं पण अंतर वाटे छोटं

आणखीन सुख जे होतं त्याखेरीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं || ४ ||

प्रत्येक क्षितिजापुढती मजला लोक दिसत होते
गंमत म्हणजे तेही पुढे पुढे पळत होते
तरीही तेच लक्ष्य माझे विचार म्हणत होते

समोर दिसेल ते सारं मला काबीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं || ५ ||

धावता धावता श्वासांमधला हरवून गेला सूर
क्षितीज मात्र जात राहिलं माझ्यापासून दूर
आयुष्य जणू जळत होतं जळे जसा कापूर

पुढे जाण्या केवळ निधडं काळीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितिज हवं होतं || ६ ||

आयुष्य सरत आलं आता धावून धावून थकलो
क्षितिजाच्या ह्मा मॄगजळाने मी तर पुरता चकलो
आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांना मुकलो

कुणीतरी सांगायला ‘आता पुरे, जरा नीज’ हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितिज हवं होतं || ७ ||

शेअर करा
33

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो