बातम्या
सप्टेंबर 21, 2012बाथरूममधला मी
नोव्हेंबर 2, 2012इन द लाँग रन…
लहान सहान गोष्टींवरून तक्रारी, थोड्या मनाविरुद्ध बोललं गेलेल्या शब्दांवरून भांडणं, एवढ्याशा कारणावरून रुसवे फुगवे… हे सारं करताना आपण जणू अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागतो. आणि रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांमधील आनंद हरपताना एक त्रिकालाबाधित सत्य विसरतो की ‘इन द लाँग रन…’
त्याने माझी पेन्सिल तोडली, तिने माझं पुस्तक फाडलं
लहानग्यांच्या तक्रारींनी मोठ्यांमध्ये भांडण जुंपलं
पेन्सिल पुस्तक बाजूस सारून मुलं लागली खेळायला
मोठे मात्र म्हणत राहिले मी नाही जाणार बोलायला
आयुष्यात तोंड नाही बघणार
बोलला होतात काय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || १ ||
आॅफिसमधला सहकारी आहे साहेबाचा चमचा
साहेबाचे कान हलके पत्ता कटणार आमचा
साल्याची एकदा जिरवतोच गहाळ करतो फार्इल
मग बस शंख करत प्रमोशन हातचं जार्इल
विचार केला होता ना
ओढावे ह्माचे पाय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || २ ||
माझ्या पुढचा ड्रायवर गाडी चालवतोय मजेत
काय वाटतंय लेकाला फिरायला आलाय बागेत?
बायको मुलं गाडीत आहेत भान गेलो विसरून
आर्इ मार्इच्या चार चांगल्या शिव्या दिल्या हासडून
गाडीचा त्या अपघात व्हावा
वाटलं होतं काय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ३ ||
आजच्या वन डे मॅचकरता गेलो होतो झपाटून
वीस षटकांत गारद झालो मार खाल्ला सपाटून
एवढे पैसे मिळतात तरी सिरीज हरून आले
मॅच फिक्सिंग झालं असणार देश विकतात साले
त्यांना त्यांचे पैसे मिळाले
तुम्हाला मिळालं काय?
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ४ ||
इंग्रज जर्मन आपसात लढले अमेरिका विरूद्ध जपान
मध्यपूर्वेत पेटलं होतं इराक विरूद्ध इराण
दहशतवादी युद्ध पेटलंय बाब झाली दैनिक
चर्चिल स्टॅलिन ग्रेट ठरतात बळी जातात सैनिक
हिटलर गेला सद्दाम गेला
तुमचा पाड काय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ५ ||
तुमच्या पणजोबांनीही वैर केलं असेल
आयुष्यभर जिद्दीने ते खांद्यावर पेललं असेल
तुमच्या पणजीनेही नक्कीच केला असेल जाच
दोन सुना आवडत्या आणि नावडत्या असतील पाच
पणजे पणज्या सुना वैरी
कोणी राहिलंय काय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ६ ||
त्याच्या पापाचा घडा आधी भरला पाहिजे
मी जिंकलो नाही तरी चालेल पण तो हरला पाहिजे
हेवे दावे द्वेष मत्सर ह्मांनी जीवन भरलंय
वैर नंगा नाच करतंय प्रेम मात्र हरलंय
आयुष्यात सारं जिंकाल
मरणाला जिंकाल काय
अरे सोड
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ७ ||
दुनियादारीने जग सुधारेल ह्माची काय हमी
तुमच्या चरफडण्याने तुमचंच आयुष्य होतंय कमी
आर्इ वडिलांशी प्रेमाने बोला शब्द दोन चार
सहकाऱ्यांशी हसून बोला पहा चमत्कार
मन:शांती लाभली तर तेच
सुख नाही काय
विचार कर
इन द लॉंग रन एवरिवन इज गोइंग टू डाय || ८ ||