logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
क्षितीज
ऑगस्ट 1, 2014
जिंकणाऱ्यांची दुनिया
सप्टेंबर 5, 2014
आरसा
ऑगस्ट 15, 2014
समांतर ब्रह्मांडांची कल्पना प्रगत भौतिकशास्त्राच्या कक्षेत येते. मात्र आपल्या सानिध्यात, आपल्या घरातही एक समांतर ब्रम्हांड असतं ज्यात डोकावण्याच्या खिडक्यांचं काम करतात घरी दारी असणारे आरसे! त्या ब्रह्मांडातील व्यक्ती आपल्याकडे प्रतिबिंब म्हणून बघत असतील का? काही असलं तरी त्या ब्रह्मांडाची नाळ आपल्या ब्रह्मांडाशी कायमची जोडली गेलेली आहे एवढं नक्की!

दिवस असो वा रात्र असो तो काम करतसे भला
जाता येता नियमित माझी छबी दाखवी मला
माझ्या आयुष्याचा तंतोतंत असा तो ठसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || १ ||

आरशातल्या माझे असते खचितच न्यारे घर
पदर साडीचा पत्नी घेते उलट्या खांद्यावर
माझ्या तुलनेमध्ये त्याचा भांग उलट तो कसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || २ ||

आरशातल्या जगतामध्ये गोष्ट प्रत्येक उलटी
सचिन खेळतो लेफ्टी तेथे लारा पण राइटी
पश्चिम खिडकीमध्ये येतो सकाळचा कवडसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ३ ||

घड्याळातले पहा तेथल्या उलटे फिरती काटे
फोटोमध्ये आर्इवडिलांची अदलाबदली होते
कडक गणपती उजव्या सोंडेचाही दिसे छानसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ४ ||

आरशातला तो मी असतो पठ्ठा रूबाबदार
पोट आत अन् छाती दुप्पट डोळे पाणीदार
पक्का इडियट मला म्हणे तो बच्चन येऊन जसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ५ ||

आरशामधील मी माझा तो मित्र जवळचा खूप
विचार समजून घेतो माझ्या मनातले गुपचूप
गुपिते माझी लपवून ठेवी जणू घेतला वसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ६ ||

आरशातल्या माझ्यामध्ये दिसे मज अंतरंग
शरीर दाखवी तसे दाखवी मनाचेही तो ढंग
अस्तित्वाची साक्ष मनाला पटवून देतो असा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ७ ||

आरशातल्या माझी काही दु:खे असतील काय
त्यालाही ती वाटून घ्यावी वाटत नसेल काय
मन अपुले मोकळे कधीही करत नाही तो तसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेर्इ मला आरसा || ८ ||

शेअर करा
18

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो