व्यसन
जून 17, 2016सुखाचा प्रवास
जानेवारी 9, 2019आपण एक काम करूया
माणूस हा समुदायात राहणारा प्राणी आहे. समुदायात प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या भावना, स्वतःच्या श्रद्धा, स्वतःची विचार करण्याची पद्धत असते. अशा विभिन्न व्यक्ती आणि व्यक्तिमत्वांमुळेच समाज बनतो. कधी कधी मुद्दाम भडकवलेल्या भावनांच्या भरात आपण समुदायाचा हा नियम विसरून जातो …
आपल्याला एक धोका आहे
आपला देश धोक्यात आहे
आपल्या देशाचा अपल्याला अभिमान, नाही… गर्व, नाही… माज हवा
आपण एक काम करूया
आपल्या देशाला आपण वाचवूया
बाकी सारे देश बेचिराख करून…
वाह्! पण आपल्याला अजूनही एक धोका आहे
आपला धर्म धोक्यात आहे
आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान, नाही… गर्व, नाही… माज हवा
आपण एक काम करूया
आपल्या धर्माला आपण वाचवूया
बाकी सारे धर्म बुडवून…
वाह्! पण आपल्याला अजूनही एक धोका आहे
आपली भाषा धोक्यात आहे
आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान, नाही… गर्व, नाही… माज हवा
आपण एक काम करूया
आपल्या भाषेला आपण वाचवूया
बाकी सार्या भाषिकांना पळवून लावून…
वाह्! पण आपल्याला अजूनही एक धोका आहे
आपली जात धोक्यात आहे
आपल्या जातीचा आपल्याला अभिमान, नाही… गर्व, नाही… माज हवा
आपण एक काम करूया
आपल्या जातीला आपण वाचवूया
बाकी सार्या जातींचं दमन करून…
वाह्! आता अगदी थोडीच कामं राहिली
मग आपण अगदी सुरक्षित होऊन जाऊ
मग आपल्याकडे कुणीही वाकडी नजर करून बघणार नाही
मग आपण आपल्याला हवा तसा आदर्श समाज वसवू शकू
वाह्! आता सगळी कामं झाली
आता आपण अगदी सुरक्षित आहोत…
ऐकताय ना? आता आपण अगदी…
कोणी आहे का माझं बोलणं ऐकायला?
कोणी आहे का…?
4 Comments
Khup sundar
perel te ugavel n aapan ek kaam karuya
khup jaast avadali
मनःपूर्वक धन्यवाद…
आपण एक काम करूया ह्या कवितेत सध्याची वस्तुस्थिती सुंदर व्यक्त केली आहे. धर्माच्या आनि जातीच्या नावाखाली नको तेवढे जनतेला पेटवतात.
ते पेटवतात आणि आपण पेटतो…