logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
नकोशी तारीख
डिसेंबर 5, 2014
लक्ष कुठे
जानेवारी 2, 2015
आता केस पिकले
डिसेंबर 19, 2014

D

केस पिकण्यामागे जैवरासायनिक कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की की त्या वयात मनुष्य आयुष्याचं सिंहावलोकन करायला शिकतो. आयुष्यात अनुभवलेले हेवे-दावे, भांडणं, सुख-दुःखाचे प्रसंग . . . एकूण आयुष्यापुढे कोते वाटू लागतात. तुम्हाला आलाय का असा अनुभव?

आयुष्य असते फारच मोठे मजला कळून चुकले
आता केस पिकले || धृ ||

फारा वर्षांपूर्वी भारत क्रिकेटमध्ये हरला
वाटे आपला क्रिकेटमधला काळ सुगीचा सरला
काही वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता ठरला

समयाचे पारडे फिरूनिया आपल्या बाजूस झुकले
आता केस पिकले || १ ||

नेता एक अडकला करता पैशांचा घोटाळा
छी थू केली लोकांनी अन् चेहेरा केला काळा
विकल्प देतो स्वच्छ सांगूनी पुन्हा निवडून आला

पुन्हा लाच खाऊनी त्याने कितीक पैसे गिळले
आता केस पिकले || २ ||

मित्राच्या साध्या वाक्याने मनास लागे ठेच
अहंकार माझ्या मनातला मुळात कारण हेच
कसे त्यास बोलते करावे आता पडला पेच

अहंपणाहून मैत्री मोठी माझे मन हे शिकले
आता केस पिकले || ३ ||

नकार मिळता तिच्या मुखातून पचला नव्हता धक्का
भीष्मासम ब्रह्मचर्य पाळीन विचार केला पक्का
गृहस्थ पुरता आता शंका नाही एकही टक्का

प्यार मुहोब्बत असली गाणी ऐकून कान किटले
आता केस पिकले || ४ ||

ह्या बाजूने त्या बाजूने लोक करती वितंड
कुणी करतसे विरोध नैतिक कुणी करतसे बंड
कुणी वाहती लाखोल्या अन् कुणी थोपटी दंड

कैसा घालू वाद मला जर दोन्हीकडचे पटले
आता केस पिकले || ५ ||

सुखात असता परिस्थितीने हुरळून होतो जात
ठाऊक नव्हते दु:खावरती कशी करावी मात
विसरत होतो दिवसानंतर येतच असते रात

समजू लागलो सुखदु:खाचे दिवस कधी ना टिकले
आता केस पिकले || ६ ||

धकाधकीच्या जीवनात मी पूर्ण जाई वाहून
मनात होते ते ते म्हटले होईल मागाहून
बऱ्याच गोष्टी बघता बघता जाती अशा राहून

सौख्याचा मोबदला म्हणुनी आयुष्य का हो विकले
आता केस पिकले || ७ ||

आयुष्य असते फारच छोटे मजला कळून चुकले
आता केस पिकले || धृ ||

शेअर करा
41

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो