logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
चांगलं तेवढं घ्यावं
ऑक्टोबर 2, 2015
अफूची गोळी
जानेवारी 15, 2016
आठवणी
नोव्हेंबर 20, 2015
भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो . . .

उशीरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
आठवणी राहून जातात || धृ ||

बालपणी मज समजत नव्हती
भाषा जेव्हा नीट
आर्इच्या बोलांची गोडी
होती तरीही अवीट

मायेचे बोबडे असे ते बोल वाहून जातात
आठवणी राहून जातात || १ ||

वर्गामध्ये बडबड चाले
असे संगती मित्र
विषय वहीच्या शेवटच्या त्या
पानावरचे चित्र

चित्रं कोणती तपशील कुठले सारे वाहून जातात
आठवणी राहून जातात || २ ||

कॉलेजातील दिवस वेगळे
मौजमजेचे छान
वडील सांगती पुढे काय ते
ठेव जरासे भान

मोठ्यांचे सारे कळकळीचे उपदेश वाहून जातात
आठवणी राहून जातात || ३ ||

पहिल्यांदा ती दिसली जेव्हा
गेली होती वाचा
धीर करूनी तरी बोललो
तिच्याशी एकदाचा

हसली अखेर जयामुळे ती आर्जवं वाहून जातात
आठवणी राहून जातात || ४ ||

मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
कधी मित्र तर सहकारी कधी
उद्धट माझे बोल
आर्इवडील कधी कधी पत्नीशी
वदलो सोडून तोल
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ

मन मोठे करूनी सर्वांनी
जरी सोसले घाव
मागे उरले खचित परंतू
मनात कडवट भाव
प्रायश्चित घेण्यास जाणवे
शब्दांचा अभाव

उशीरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
आठवणी राहून जातात || ५ ||

शेअर करा
91

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • देव मे 23, 2022
  • पुरुषप्रश्न मार्च 8, 2022
  • प्रेमात पडल्यावर काय होतं फेब्रुवारी 14, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो