logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
आठवणी
नोव्हेंबर 20, 2015
सोयीस्कर देशभक्ती
मार्च 4, 2016
अफूची गोळी
जानेवारी 15, 2016
घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते.

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी || धृ ||

बालपणातच ठरून जात असे आयुष्याचा पाया
कडकपणाने बापाच्या जातसे पुत्र तो वाया
बापापुढती नेहेमी त्याला पाठीशी घातले
चूक वागणे ठाऊक तरीही आड येतसे माया

आर्इच्या त्या मायेकरता पुरली कुठली झोळी
पुत्रप्रेम आर्इकरता अन् असे अफूची गोळी || १ ||

नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण
येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन
कर्मचारी आपुले पण सार्‍या देशी सर्वोत्तम
सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण

हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी
काम कर्मचा-यांकरता ती असे अफूची गोळी || २ ||

ऑफिसाचे काम सारखे करूनी पुरता थकलो
गरजा घरच्या भागविताना ओझ्याने वाकलो
येर्इ बातमी विश्वचषक जिंकून आपण आणला
तेव्हा वाटे मर्दुमकीने स्वत:च जग जिंकलो

विजयाचा तो स्वाद अंतरी किती दिवस मग घोळी
क्रिकेट मध्यमवर्गीयांकडे असे अफूची गोळी || ३ ||

रात्रंदिन मरमरूनी चांंगला खूप कमवला पैसा
पत्नी म्हणे घरी नसशी आपुला असला प्रपंच कैसा
तिला दिले दागिने मुलांना कपडेलत्ते भारी
केली वल्गना प्रेमळ तुमचा बाप पाहा हा ऐसा

बने विस्तवावरी धनाच्या भावनांचीही पोळी
पैसा हा नवश्रीमंतांना असे अफूची गोळी || ४ ||

महागार्इ वाढली पडे अन् सुविधांचा दुष्काळ
गरिबी हटाव घोषणांचीही नाही शिजली डाळ
धार्मिक भावभावनांना मग घालावे खतपाणी
मी मंदिर पाडतो आणि तू मशीद कुणाची जाळ

गरिबी विसरून परस्परांची करती राखरांगोळी
जनतेकरता धर्म जात ही असे अफूची गोळी || ५ ||

करून पाहिले धर्मकारणही नाही फायदा झाला
सत्तेच्या पायावर आला जनक्षोभाने घाला
अशा वेळी देऊन नव्याने देशभक्तीला साद
झोकून देशाला समरी मग सत्तापालट टाळा

नागरिक मग उठतील घेण्या छातीवरती गोळी
देशप्रेम हे जगी कुठेही असे अफूची गोळी || ६ ||

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी || धृ ||

शेअर करा
94

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो