logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
लोकमान्य
ऑगस्ट 1, 2020
सकाळ संध्याकाळ
ऑक्टोबर 1, 2020
वाळवी
सप्टेंबर 15, 2020
आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आहे. पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण एक महत्त्वाचे घटक आहोत ह्याचा मला आनंद वाटतो. लोकशाहीबद्दल, विशेषतः आपल्या देशातील लोकशाहीबद्दल अनेक स्तरांवर टीका होत असते. अशी टीका आपण व्यक्त करू शकतो हाच कदाचित आपल्या लोकशाहीचा सर्वात मौल्यवान पैलू असावा …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/wkfNzT0UTeE ह्या ठिकाणी ऐकता येईल.

विश्वाचे आकर्षण ऐसा महाल आहे एक
मानवतेच्या परिमाणांचा जेथ होई आरंभ
सुबक भव्य रेखीव देखणा सर्वच पैलू सुरेख
भक्कम करती महालास त्या चार अनोखे स्तंभ

परंतु सौख्यामध्ये तेथ जणू विष कुणी कालवी
कळली नाही कशी लागली महालास वाळवी ॥

पहिला स्तंभ राज्यकर्त्याचा सेवक तो जनतेचा
जनतेचे प्रतिनिधित्व करूनी देशोन्नतीचा वसा
नव्या युगातील राजा तो सेवक बनला सत्तेचा
पोखरून संपूर्ण यंत्रणा भरे स्वत:चा खिसा

राज्य टिकविण्यास राजकारण भेदाचे चालवी
पोखरून टाकते स्तंभ तो द्वेषाची वाळवी ॥

द्वितीय स्तंभ नोकरशाहीचा यंत्रणेस वंगण
जनतेची कामे करणे त्याचे पहिले कर्तव्य
असे बांधले कार्याभवती अकार्यक्षम रिंगण
जनतेपुढती उभे ठाकले लाल फितीचे दिव्य

मानेवरती गरिबांच्या सुरी लोभाची चालवी
नष्ट करी स्तंभाला भ्रष्टाचाराची वाळवी ॥

तृतीय स्तंभ न्यायासन त्याचा दिव्य असे वारसा
उपेक्षितांना न्यायदान करणे हा पहिला धर्म
समाजातल्या ‘चलता है’ ह्या वृत्तीचा आरसा
तारखेमागून तारीख अत्याचारी जाणती मर्म

किती पिढ्यांची न्यायाची आशाच मुळी मालवी
पवित्र न्यायासनास ही विलंबाची वाळवी ॥

पत्रकार तो महालात ह्या बनला स्तंभ चतुर्थ
प्रबळ लेखणी तलवारीहून तत्त्व त्याचे अभंग
पक्षपात करूनिया परंतू घडवून आणी अनर्थ
कुरघोडीचे वृत्त देतसे असत्य आणि सवंग

निर्भिडतेचा प्रखर वारसा विस्मरूनी घालवी
चतुर्थ ह्या स्तंभास लागली स्पर्धेची वाळवी ॥

महालातला नागरिक तो अजून असे निद्रिस्त
बघतो मनात महानतेची खोटी स्वप्ने गोड
भरारेल का आत्मसन्मान आहे जो बंदिस्त
काढू शकेल तोच वाळवीवरती जालीम तोड

तेव्हा मनी महालाच्या ह्या अंकुरेल पालवी
अन् लोकशाहीच्या स्तंभांची होईल नष्ट वाळवी ॥

शेअर करा
5

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो