logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
पहिली गाडी
फेब्रुवारी 4, 2011
पिवळे पडलेले फोटो
ऑक्टोबर 7, 2016
मोबाईल फोन
फेब्रुवारी 4, 2011
आधी यंत्रयुग आणि मग संगणकयुगामुळे मानवाच्या सुविधा वाढत गेल्या आणि मग माणूस अधिकाधिक ह्या उपकरणांचा गुलाम होत गेला. सध्याचं युग आहे उपकरणांच्या सूक्ष्मीकरणाचं आणि ह्या युगाचा बिनीचा शिलेदार आहे भ्रमणध्वनी, अर्थात मोबाईल फोन. दूरध्वनी, घड्याळ, टीवी, कॅल्क्युलेटर, संगणक, संगीत प्रणाली, कॅमेरा वगैरे उपकरणं ह्या little championने आधीच गिळंकृत केली आहेत. आता घरातून बाहेर जाणारी व्यक्ती एकवेळ पैशांशिवाय राहू शकेल, पण मोबाईलशिवाय… अशक्य!

ही कविता वर्षं भावे ह्यांनी संगीत देऊन ‘अल्लड’ ह्या अवंती पटेलने गायलेल्या गीतसंचात समाविष्ट केली आहे.

आजूबाजूला पाहा तुम्हाला लगेच दिसून येर्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || धॄ ||

घरून सकाळी निघताना विचार करावा लागतो
पाकिट विसरून चालतं पण मोबाईल लागतो
दूधवाला, पेपरवाला, डाॅक्टर असो की वकील
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || १ ||

गावी जातानाही चालेल तिकिट विसरलात तर
पहा घेतला आहे ना नक्की आपला चार्जर
अनुपस्थितीत तुमच्या जणू पॄथ्वी बुडून जार्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || २ ||

मोठे मोठे फोननंबर असत तोंडपाठ
घरचा नंबर आठवताना आता लागते वाट
वाटलं नव्हतं मेंदूमधली जागा खाल्ली जार्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || ३ ||

आधी तिच्याशी मैत्रीचे जुळवावयास धागे
कोपऱ्यावरती तासंतास उभं राहावं लागे
आता एसेमेसनेच दिलं घेतलं जातं दिल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || ४ ||

आधी बघायचे छत्तीसपैकी गुण किती जुळतात
आता मात्र मोबाइलचं नेटवर्क तपासतात
लग्नानंतर तेवढाच एक खर्च कमी होर्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || ५ ||

एक कुटंबं सहा फोन परिस्थिती ती बिकट
स्कीम आहे घरच्यांबरोबर बोलणं आहे फुकट
डोळे होतात पांढरे जेव्हा येतं मासिक बिल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाइल || ६ ||

फोन तोच घड्याळ तोच कॅमेराही तोच
कॅल्क्युलेटर तोच आणि संगणकही तोच
काही दिवसांत देवाचीही जागा तोच घेर्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || ७ ||

समजण्यास मरणानंतर काय वाटते जगा
एक दिवस मोबार्इल बंद ठेवून बघा
तुम्ही राहाल तिथेच आणि जग पुढे जार्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || ८ ||

आजूबाजूला पहा तुम्हाला लगेच दिसून येर्इल
शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल || धॄ ||

शेअर करा
4

आणखी असेच काही...

जुलै 7, 2018

चॉकलेट


पुढे वाचा...
एप्रिल 23, 2018

पुस्तक


पुढे वाचा...
ऑक्टोबर 7, 2016

पिवळे पडलेले फोटो


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो