logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
पिवळे पडलेले फोटो
ऑक्टोबर 7, 2016
चॉकलेट
जुलै 7, 2018
पुस्तक
एप्रिल 23, 2018
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! किती पोकळ वाटतात ह्या शुभेच्छा… जागतिक भीमसरट दिनाच्या शुभेच्छा म्हटल्यासारखं… कुणे एके काळी भाषेची, समाजाची, राज्याची श्रीमंती लिहिल्या आणि वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांवरून ठरत असे. आता मात्र संगणक आणि स्मार्टफोन्सच्या वावटळीत पुस्तकांची वाळलेली पानं भिरभिरत उडून गेलेली दिसतात. अशाच एका पुस्तकाचं हे आत्मकथन….

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/lWQzAtCCABA ह्या ठिकाणी ऐकता येईल.

अंधुक झाली सारी
दुनिया होती न्यारी
काचेवरती आता
धूळ साचली भारी

जुनं वाचनालय
आहे किती समय
बंद करतील आता
वाटे मजला भय

मोठ्या एका मंत्र्याचं म्हणे बने इथे स्मारक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || १ ||

कथा व कादंबरी
गंमत त्यांची खरी
कल्पनेतले धागे
वस्त्र बने भरजरी

जे न पाहे रवी
पाहायचे ते कवी
तिला भुलविण्याकरता
कविता वाटे हवी

आमच्यामध्ये वसले मोठे कवी आणि लेखक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || २  ||

होती आमुची शान
मोठे आणि लहान
वाचून काढत होते
आमचं पानन् पान

ज्ञानाचे ते धन
आणि मनोरंजन
आम्हीच तेव्हा होतो
बुद्धीचे चलन

सरस्वतीचे रूप म्हणुनी होती नतमस्तक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || ३ ||

टीवीपुढती बसून
जगच येई दिसून
मुले कशी ती गेली
आमुच्यावरी रूसून

संगणकाची लाट
अशी पसरली आत
विज्ञानाने केली
आमुच्यावरती मात

शाळेमध्येसुद्धा आता शिरलाय संगणक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || ४ ||

अजून वाटे मनाला
सांगावे जनाला
मित्रच तुमचे आम्ही
शंका का कुणाला

यावे परत फिरूनी
हातामध्ये धरूनी
अमृतप्राशन तुम्ही
अन् पाहावे करूनी

वाटत नाही परंतु मिळतील आम्हाला वाचक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || ५ ||

वाटत नाही हेवा
एक मागणे देवा
देऊ दे मज असाच
आनंदाचा ठेवा

रद्दीवाला आता
मजला घेऊन जाता
कागद जे बनविती
लागो त्यांच्या हाता

पुढल्या जन्मीसुद्धा होर्इन सरस्वतीचा हस्तक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक || ६ ||

शेअर करा
6

आणखी असेच काही...

जुलै 7, 2018

चॉकलेट


पुढे वाचा...
ऑक्टोबर 7, 2016

पिवळे पडलेले फोटो


पुढे वाचा...
फेब्रुवारी 4, 2011

मोबाईल फोन


पुढे वाचा...

2 Comments

  1. विवेक म्हणतो आहे:
    एप्रिल 23, 2018 येथे 11:27 AM

    उत्कृष्ट काव्या नुभव

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      एप्रिल 24, 2018 येथे 10:24 AM

      धन्यवाद विवेकजी …

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो