logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
माया
जून 5, 2020
चुटपुटती ती भेट
जून 27, 2020
माझी शाळा
जून 12, 2020
आज जागतिक बालमजुरीविरोधी दिन आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात ‘माझी शाळा’ म्हटलं की अनेक आठवणी दाटून येतात. पुस्तकं, वह्या, मित्र, शिक्षक, खेळ, अभ्यास, गमतीजमती… काही वाईट पण बहुतेक सगळ्या छान आठवणींनी आपलं ऊर दाटून येतो. पण प्रत्येकाच्या मनात ‘माझी शाळा’ ह्या शब्दांचा अर्थ सारखाच असतो का?

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/JQ18As1xBMM ह्या ठिकाणी ऐकता येईल.

दोन खांबांवर आडवा फलक, लांबून दिसत असे प्रवेशद्वार
चार मजली होती तरी ती इमारत होती मोठी टुमदार ॥

प्रयोगशाळा, वाचनालयं, बाक आणि फळे ठेवलेले वर्ग
शाळा कसली तो तर होता मुलांकरता स्वर्ग ॥

शाळेच्या पुढ्यात एक मोठं अंगण होतं पसरलेलं लांबच लांब
अंगणाच्या मध्यभागी चौथऱ्यावर होता एक उंचच उंच खांब ॥

खुलून दिसत होता इमारतीला दिलेला रंग पांढरा आणि निळा
डोळे भरून बघत होतो दिमाखदार अशी ती माझी शाळा ॥

दोन वर्षांपूर्वी आलो तेव्हा इथे होतं नुसतं माळरान
झाडंझुडूपं तोडून आम्ही इथेच बांधली एक झोपडी लहान ॥

सहा वर्षांचा होतो बहुतेक जेव्हा पहिल्यांदा इथेच घेतलं खांद्यावर छोटं पोतं
आईने मोठ्या कौतुकाने मोडली होती कानशिलावर बोटं ॥

आता रोज काम करतो त्याचं कुणी करत नाही कौतुक
मलाही कळलंय काम केलं नाही तर शमेल कशी पोटाची ह्या भूक ॥

माझ्या शाळेकरता केलंय दोन वर्षं काम मी रग्गड
प्रत्येक मजल्यावर माझ्या हाताने लावलेला एक तरी असेल दगड ॥

इथे मुलं नक्की काय करणार मी विचार करत असे रात्री
पण काहीतरी छान असणार मला नक्की होती खातरी ॥

कालच काढल्या झोपड्या आणि स्वच्छ केली घाण
आमच्या झोपड्या काढल्यावर माझी शाळा दिसणार होती जास्त छान ॥

आज शाळा उघडणार होती जमली होती गर्दी
सगळ्यांबरोबर मलाही मिळाली होती एक बर्फी अर्धी ॥

संसार खांद्यावर टाकून आम्ही निघालो होतो पुढच्या गावी
समोरून शाळेत येणाऱ्या मुलांच्या खांद्यावर होते खाऊचे डबे आणि दप्तरं नवी ॥

एक रंगीबेरंगी कापड फडकत होतं त्या माझ्या शाळेच्या अंगणातील उंच खांबावर
मला काय त्याचं, मला पुढल्या गावी जाऊन बांधायचं आहे माझं एक टोलेजंग घर ॥

शेअर करा
7

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो