logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
अनादी अनंत लढा
नोव्हेंबर 18, 2020
कूस
फेब्रुवारी 7, 2021
माझाच देव महान
जानेवारी 17, 2021
आज जागतिक धर्मदिन आहे. पृथ्वीवरील एका जीवाला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तो निसर्गातील घडामोडींचा अर्थ लावू लागला. सुसूत्रतेने चालणाऱ्या निसर्गचक्रामागे एखादी अतिमानवीय शक्ती असणार ह्याची त्याला खातरी पटली. त्यातून देव आणि मग धर्म ह्या संकल्पनांचा जन्म झाला. मानवाच्या त्याच वैचारिक क्षमतेमुळे पुढे विज्ञानाची वावटळ आली ज्यात असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची काही निराळीच उत्तरं मानवाला मिळू लागली. देव आणि धर्म मात्र तिथेच राहिले …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/z0fuibfFQ48 ह्या ठिकाणी ऐकता येईल.

पूजा सारे करत मुल हवं असेल तर
ग्रीसमधील देवीचं त्या नाव डेमिटर
ओलांडायची नसेल जर का जीवनाची वेस
साकडं घालत मृत्यूचा होता देव हॅडेस
देवांचाही राजा होता झिअस ज्याचं नाव
उपासनेच्या शर्यतीत मोठं त्याचं नाव
सण साजरे करत होते भक्तीभावे सहर्ष
संस्कृती ती अस्तित्वात होती सहाशे वर्षं
रोमन सत्ता नंतर आवळे असा भयंकर पाश
बघता बघता होऊन गेला संस्कृतीचा विनाश
संस्कृतीची जेव्हा सारी लयास गेली ठेव
कुठे गेले असतील सारे बलाढ्य त्यांचे देव? ॥ १ ॥

तेरा देव मिळून बनवती मनुष्याची जात
माया संस्कृतीचे लोक स्तुती त्यांची गात
विश्वनिर्मिती करतो त्यांचा देव गुकुमाझ
अमेरिका खंडात त्याचा दुमदुमला आवाज
प्रसन्न ठेवा मृत्यूचा तो देव आह पक
मृत्यूनंतर गाठाल नाहीतर झिबल्बा नरक
अमेरिकेत फोफावली ती संस्कृती चिकार
थोडीथोडकी नाहीत चांगली वर्षं अडीच हजार
स्पेनमधून आले सैनिक बंदूका आणि घोडे
बघता बघता उरले लोक शतांशाहून थोडे
लुप्त झाले फुटता तेथे आक्रमकांचं पेव
कुठे गेले असतील सारे बलाढ्य त्यांचे देव? ॥ २ ॥

समुद्रातून जग बनवती ऑग्डोड देव आठ
इजिप्तमधले एकूण देव सतराशे अन् साठ
काम करत होता देव त्यांचाही दिनरात
प्रतिपालक तो जगाचा नाव त्याचं मात
सर्वात जास्त उपासनेला पात्र देवी इसिस
मृत्यूचाही देव होता त्यांचा तो अनुबिस
दिडशे पिढ्या चालला होता इजिप्तचा कारभार
अस्तित्वात संस्कृती ती वर्षं तीन हजार
सतत परक्या आक्रमणांनी अशी जर्जर केली
नाईलच्याच पाण्यासंगे जशी वाहून गेली
कधी काळी जगात ज्यांचं स्थान एकमेव
कुठे गेले असतील सारे बलाढ्य त्यांचे देव? ॥ ३ ॥

आजही आहे संस्कृती अन् आजही चाले पूजा
आजही म्हणती आमचाच देव नाही कोणी दुजा
सारे म्हणती एकच देव रूपं त्याची अनेक
देवाचंच नाव घेऊन चाले पण अतिरेक
मनीच्या वाईट प्रवृत्तींना घालण्याला लगाम
देव बनवतो आपण त्याचे बनतो पण गुलाम
मानून चाला देवच असतो कायम संगतीला
माणूस बनूनच यावं लागतं त्याला मदतीला
माणसापेक्षा जास्त देती देवाला महत्त्व
माणसावर अवलंबून असतं देवाचं अस्तित्व
कणखर मनी शोभे ती देवाची उठाठेव
दुबळ्या मनात राहील कसा बलाढ्य तुमचा देव? ॥ ४ ॥

शेअर करा
17

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो