देव असावा कसा
जुलै 18, 2014सणावली
एप्रिल 6, 2019हरीचरण शरण
अनेकदा टॅक्सी, रिक्षा, गाड्यांच्या मागे ‘देवाक् काळजी’ असं लिहिलेलं असतं. देवावर एकदा सारा भार सोपवला की मनःशांतीची द्वारं खुली होत असतील. शंका, चिंता किंवा विघ्न अशा कोणत्याही प्रसंगात आपलं ओझं वाहणारी एक समर्थ शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे हा दिलासा माणूस नेहमीच मनात जपत आलेला आहे . . .
घेरून येती शंका
वाजे निराश डंका
करण्यास सह्म डंखा
हरीचरण शरण जावे || १ ||
खुंटे मनी विचार
भासे आयुष्य भार
कोणीच ना आधार
हरीचरण शरण जावे || २ ||
उपचार ह्मा तनास
येतील का गुणास
ठाऊक ना कुणास
हरीचरण शरण जावे || ३ ||
आयुष्य कार्यमग्न
होर्इल ध्यान भग्न
कार्यात येर्इ विघ्न
हरीचरण शरण जावे || ४ ||
विघ्ने करूनी मात
आनंद जीवनात
शांती असे मनात
हरीचरण शरण जावे || ५ ||
ठेवू नकोस किंतु
मोही नकोस गुंतू
वाहून सर्व तंतू
हरीचरण शरण जावे || ६ ||
दिवसाही आणि राती
ऋतू सर्व येत जाती
विसरून समयनाती
हरीचरण शरण जावे || ७ ||
घालू नयेत वाद
प्रितीस द्यावी साद
हरीस्मरण करित नाद
हरीचरण शरण जावे || ८ ||