प्रश्न
ऑक्टोबर 7, 2011निकाल
एप्रिल 19, 2013बाप्पांची आरती
गणपतीबाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचा अगदी लहानपणापासूनचा लाडका देव. आजच्या संगणक आणि टीवीच्या काळातील बाळगोपाळ मंडळीही बाप्पांच्या आगमनाने तेवढीच उल्हासित झालेली दिसतात. बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आरत्याही आल्या. लहानपणी त्या संस्कृतप्रचुर ‘रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा…’ वगैरे आरत्यांमधील बरेच शब्द पार डोक्यावरून जात असत (काही शब्द तर अजूनही डोक्यावरून जातात). त्या आठवणी स्मरून खास बच्चेकंपनीकरता ही ‘बाप्पांची आरती’ तुमच्या घरातील आणि आजूबाजूच्या बाळगोपाळांना आवडते का ते पाहा…
कित्ती दिवस झाले गेलात परत
तुमच्यावाचून आता नाही हो करमत
सांगायच्यात तुम्हाला बातम्या कितीतरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || १ ||
म्हणती आलाय तुमचा बर्थडे जवळ
वाट पहातेय किती निघत नाही कळ
पार्टी करू छान केक नसला तरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || २ ||
तुमचं येणं म्हणजे मज्जाच मोठ्ठी
मोदकांचं जेवण शाळेला सुट्टी
पाहूणे घरी वर्दळ भारी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ३ ||
सांगतात आहात मोठे तुम्ही देव
आशीर्वादा डोकं पायावर ठेव
कळत नाही त्यांना आपली मैतरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ४ ||
कित्ती दिवस झाले गेलात परत
तुमच्यावाचून आता नाही हो करमत
सांगायच्यात तुम्हाला बातम्या कितीतरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || १ ||
म्हणती आलाय तुमचा बर्थडे जवळ
वाट पहातेय किती निघत नाही कळ
पार्टी करू छान केक नसला तरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || २ ||
तुमचं येणं म्हणजे मज्जाच मोठी
मोदकांचं जेवण शाळेला सुट्टी
पाहूणे घरी वर्दळ भारी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ३ ||
सांगतात आहात मोठे तुम्ही देव
आशीर्वादा डोकं पायावर ठेव
कळत नाही त्यांना आपली मैतरी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ४ ||
रंगवून घेतला खास चंदनाचा पाट
नैवेद्याला लखलख अन् चंदेरी ताट
आरास केली रात्र जागून सारी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ५ ||
एकवीस मोदकांची मेजवानी छान
उटणं लावून रोज घालीन स्नान
साती दिवस बसीन तुमच्या शेजारी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ६ ||
ठाऊक तुम्ही राहणार दिवस सात
पुन्हा पाहीन तुमच्या येण्याची वाट
त्या आधी मज्जा करू या सारी
बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी || ७ ||