logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
अजब जंगल
मे 20, 2011
बाप्पांची आरती
सप्टेंबर 7, 2012
प्रश्न
ऑक्टोबर 7, 2011
सणासुदीचे दिवस म्हणजे घरी देव-देवतांचा उल्लेख होणं ओघानेच आलं. अशा वेळी मोठ्या माणसांना न पडणारे प्रश्न लहान मुलांना साहजिकपणे पडतात. त्यात सुट्ट्या सुरु झाल्या की मग तर प्रश्नांना ऊत येतो. पहा ह्या प्रश्नांची उत्तरं देणं जमतंय का …

मोठी माणसं पहा सारी नुसतीच मारतात गप्पा
प्रश्नांची ह्मा उत्तरं तुम्हीच द्या ना बाप्पा!

आंघोळ सूर्यदेवाला आहे का हो माफ?
पाणी घेतलं अंगावर तर नुसतीच होर्इल वाफ

गणपतीला कळतं कसं पेस्ट घ्यायची किती?
एवढे मोठे दात रोज होत असेल रिती

मला झोपवणं आर्इकरता गोष्ट नाही सोपी
रावण दहा डोक्यांनी कसा जार्इ झोपी?

मारूतीचं तोंड नेहमी हुप्प होतं असं
रागावला तर आर्इला समजत होतं कसं?

शंकराला नाद लागला वाचन करण्याचा
कसा मिळेल चष्मा त्याला तीन डोळ्यांचा?

ब्रह्मदेवास तीन डोकी एक मजला सांग
कसा पाडतो एवढ्या सगळ्या केसांचा तो भांग?

पांडव होते पाच पण कौरव होते शंभर
होती त्यांना नावं का नुसतेच होते नंबर?

दादाला मी विचारण्याचा केला जेव्हा यत्न
म्हणतो मला थांब दाखवतो चौदावं रत्न

तार्इ माझी विसरून गेली मी तर तिचा भाऊ
अंगावरच आली म्हणते डोकं नको खाऊ

आर्इला मी विचारलं तर मला म्हणते लुच्चा
नाक मुरडून माझा मग घेते गालगुच्चा

बाबांना तर प्रश्न ऐकून आला राग फार
मला म्हणाले गप्प बस नाहीतर देतो मार

म्हणून म्हणतो मोठी माणसं नुसतीच मारतात गप्पा
प्रश्नांची ह्मा उत्तरं तुम्हीच द्या ना बाप्पा!

शेअर करा
1

आणखी असेच काही...

नोव्हेंबर 14, 2021

बेडकांची शाळा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 14, 2018

शेपटी


पुढे वाचा...
सप्टेंबर 12, 2018

बाप्पांचे पर्यावरण


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो