logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
आई नावाचं मशीन
फेब्रुवारी 4, 2011
अजब जंगल
मे 20, 2011
चतुर कुत्रा
फेब्रुवारी 4, 2011
जंगलात हरवलेल्या कुत्र्याच्या अगदी जीवावर बेतलं होतं. पण आपला चतुरपणा वापरून कुत्र्याने – एकदा नाही तर दोनदा – आपली सुटका कशी करून घेतली त्याची ही गोष्ट.

दाट जंगलामध्ये हरवून
गेला एक कुत्रा
डोक्याने तो चतुर जरी
होता थोडा भित्रा || १ ||

वाट चुकला होता सापडत
नव्हता त्याला माग
दिसला त्याला येताना
तिथून ढाण्या वाघ || २ ||

पाचावरती धारण बसली
बोबडीच गेली वळून
आजूबाजूस कुठेच जागा
नव्हती जायला पळून || ३ ||

वाघ खाणार मला गेली
पायामधली शक्ती
लवकर करणं भाग होतं
काही तरी युक्ती || ४ ||

आजूबाजूस पाहिलं सारी
उंच उंच झाडं
एका झाडाखाली पडली
होती काही हाडं || ५ ||

पटकन बसला झाडाखाली
पाहिली नाही वाट
वाघ होता येत केली
त्याच्याकडे पाठ || ६ ||

म्हणतो चाटत हाड एक
मारत मारत मिटक्या
चवदार एवढा वाघ नसेल
जंगलामध्ये अख्ख्या || ७ ||

आणि म्हणे आणखीन एक
वाघ मिळेल तर
जेवण होऊन जार्इल माझं
चांगलं पोटभर || ८ ||

बोलणं त्याचं ऐकून मागे
वाघ दचकला
आल्या पावली मागे वळला
तिथून सटकला || ९ ||

झाडावरती बसलं होतं
माकड कावेबाज
मनात म्हणतं संधी चांगली
आली चालून आज || १० ||

वाघोबांना खरं सांगतो
आलाय चांगला मोका
मित्र बनतो त्यांचा टळेल
कायमचा तो धोका || ११ ||

पळत होता वाघ माकड
लगेच गाठी त्याला
तिखट मीठ लावून सगळा
प्रसंग नमूद केला || १२ ||

चवताळून मग वाघ गेला
ऐकून त्याचे बोल
प्राणच घेतो त्याचे
अपराधाचे एकच मोल || १३ ||

बस माझ्या पाठीवरती
दवडू नकोस वेळ
दोन घासात संपवतो मी
कुत्य्राचा त्या खेळ || १४ ||

कुत्य्राने पण पाहिली होती
माकडाची ती घार्इ
कारस्थान माकडाचे ते
समजून त्याला येर्इ || १५ ||

पुन्हा बसला पाठ करून
खाकरला अन् घसा
बोले मोठ्यांदा स्वत:शीच
वाघ आला जसा || १६ ||

घेऊन येर्इन जेवणाकरता
वाघ चांगला एक
नुसत्याच गप्पा मारत होतं
माकड ते बहुतेक || १७ ||

भुलला जर तो इतक्या सहजी
कपटी त्या माकडाला
नाव बदलूनी वाघ तयाचे
गाढव म्हणतील त्याला || १८ ||

शब्द ऐकूनी वाघ थांबला
माकडाला पाही
दातखीळ जणू बसली त्याची
शब्दच फुटत नाही || १९ ||

माकड लागे पळू लागल्या
घामाच्या धारा
कुत्य्राने मग हाडं टाकली
केला पोबारा || २० ||

शेअर करा
2

आणखी असेच काही...

नोव्हेंबर 14, 2021

बेडकांची शाळा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 14, 2018

शेपटी


पुढे वाचा...
सप्टेंबर 12, 2018

बाप्पांचे पर्यावरण


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो