logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
चतुर कुत्रा
फेब्रुवारी 4, 2011
प्रश्न
ऑक्टोबर 7, 2011
अजब जंगल
मे 20, 2011
मे महिन्याची सुट्टी सुरु आहे आणि घरातल्या बाळगोपाळांना पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटत असेल. मुलांची मात्र धमाल सुरु आहे. खास तुमच्या घरातील बच्चे कंपनीकरता एक बालगीत सादर करत आहे, ‘अजब जंगल’. त्यांना जरूर वाचून दाखवा … पाहा आवडतंय का ते!

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1YgZacK0PAM ह्या ठिकाणी ऐकता येईल.

जंगलामधून जात होतो दिसत नव्हती वाट
निळ्या गुलाबी पानांची ती झाडी होती दाट
झाडावरती बसून मासे करत होते कलकल
पक्षी होते पाण्यात मोठं अजब होतं जंगल || १ ||

काळ्या फुलावरती एका बसला होता हत्ती
फुंकर मारता उडून गेला करू लागला मस्ती
मगरी उडत होत्या गगनी चालत नव्हती अक्कल
वाघ खाती गवत मोठं अजब होतं जंगल || २ ||

भरधाव पळे कासव मागे लागली गोगलगाय
बिळात पळाला जिराफ माझा पडणार होता पाय
झाडावरच्या घरट्यात अंडी उबवत होतं अस्वल
चार पायांचा साप मोठं अजब होतं जंगल || ३ ||

ऐकली मी डरकाळी आणि बसला माझा घसा
बघत होता मला एक अक्राळविक्राळ ससा
खातो तुला म्हणाला आता होर्इल माझी चंगळ
आला डुलत डुलत मोठं अजब होतं जंगल || ४ ||

एवढ्यात आला तिथून एक डोंगराएवढा उंदीर
म्हणे सशाला निघ इथून चल मागे फिर
ससा चिडला ऐकून दोघांत जुंपली मोठी दंगल
शंभर झाडं पडली मोठं अजब होतं जंगल || ५ ||

खाली लाल गवत आणि वरती हिरवे मेघ
धुम ठोकली तिथून कमी नाही केला वेग
घरी कुणाला सांगितलं तर करतात माझी टिंगल
पण खरंच पाहिलंय मी मोठं अजब असं ते जंगल || ६ ||

शेअर करा
96

आणखी असेच काही...

नोव्हेंबर 14, 2021

बेडकांची शाळा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 14, 2018

शेपटी


पुढे वाचा...
सप्टेंबर 12, 2018

बाप्पांचे पर्यावरण


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो