logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
एकच मजला सांग …
फेब्रुवारी 4, 2011
तिची आणि माझी भेट
जून 17, 2011
बदलू नकोस
फेब्रुवारी 4, 2011
लग्नाआधी एकमेकांना भेटायला जाताना प्रियकर आणि प्रेयसी सिंड्रेला बनून जातात. आणि मग लग्नाचे बारा वाजले की बग्गीचा भोपळा आणि घोड्यांचे उंदीर होतील की काय अशी सतत भीती वाटत राहते. म्हणूनच ह्या प्रियकराचं आपल्या प्रेयसीकडे एकच मागणं आहे …

अंगणामध्ये होता भिजून गेलेला एक कुत्रा
बाकी सगळ्या कुत्य्राांपेक्षा लहान आणि भित्रा
बिस्कीट आपल्या हातात घेऊन अंगणात आलीस तू
खायला घालून बोललीस त्याला ये जवळ ये मित्रा

हळुवार ती भावना कधी हरपू नकोस तू
एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू || १ ||

गेलो होतो फिरायाला उशीर झाला खूप
घरी घेतलं तुझ्या पपांनी नरसिंहाचं रूप
मैत्रिणीकडे होते सहज पचली असती थाप
पण खोटं नाही बोललीस ऐकून घेतलंस तू गुपचूप

सत्याची ही कास कधी सोडू नकोस तू
एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू || २ ||

प्रेम केलं होतंस माझ्याआधी कुणावरतरी
मी मागणी घालता गोष्टं सांगून टाकलीस खरी
तुझ्या भावना साऱ्या तुडवून निघून गेला तो
मला म्हणालीस विसरत नाही प्रयत्न केला जरी

माझ्यावरचा विश्वास मोडून देऊ नकोस तू
एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू || ३ ||

भेटतो जेव्हा तुला माझं प्रसन्न होतं मन
असणं तुझं सुवास आणि हसणं सूर्यकिरण
जग वाटतं निर्मळ आणि जगणं वाटतं सोपं
अशक्य गोष्टींवरचं तुटतं अशक्यतेचं बंधन

आयुष्य माझं उजळवणं हे थांबवू नकोस तू
एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू || ४ ||

आयुष्याचा साथीदार निवडलं मी तुजला
तुझ्या माझ्यात आता कुठला दुरावा ना उरला
लग्नानंतर नावही नाही बदलणार मी तुझं
तू आहेस जशी अगदी तशी आवडतेस मला

प्रेम माझं सर्वंकश हे विसरू नकोस तू
एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू || ५ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो