logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
आठव
सप्टेंबर 18, 2015
गुपित
फेब्रुवारी 14, 2019
तू ने तो कभी पी ही नही
जानेवारी 6, 2017
प्रत्येक मध्यमवर्गीय गृहस्थाच्या आयुष्यात एक मित्र असा असतो जो प्रेमात पडण्याच्या बाबतीत त्या गृहस्थाचा सुप्त आदर्श असतो. सुप्त अशाकरता की प्रत्यक्षात आयुष्यभर त्या गृहस्थाने तो मित्र कसा चुकीचा वागत आहे हे त्या मित्राला आणि स्वतःलाही पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो मित्र मात्र त्याचा सल्ला प्रत्येक वेळी धुडकावून त्याला एकच सांगत असतो . . . हाय कम्बख़्त ‘तू ने तो कभी पी ही नहीं’ . . .

तुझ्या शेजारची ती माल
कटाक्षानेच व्हायचे माझे हाल
शीळ घातली तर तू चिडायचास
पण लाल व्हायचे तिचे गाल

ओळख करून दे म्हंटलं तर फेकून मारलीस वही
तू घाबरलास
तेव्हा तुला मी म्हटलं होतं हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || १ ||

कॉलेजातली प्रोफेसर चारू
होती भलतीच मारू
गेलो तिला रोज द्यायला
तर पहात होतास मला धरू

ती माझ्याशी हसून बोलली तर व्हायचं तुझं दही
तू लाजायचास
तेव्हाही मी म्हणायचो हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || २ ||

लागली नोकरी संपलं शिक्षण
माझी प्रेमासाठी तुझी पैशासाठी वणवण
म्हणायचास भविष्याचा विचार कर
ह्मावर किती भांडायचो आपण

तुला मोठे हुद्दे तर प्रेयसींची यादी माझ्या संग्रही
तुला कधीच नाही समजलं
तेव्हाही मी म्हणायचो हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || ३ ||

आधी तुझं झालं लग्न
संसारात झालास तू मग्न
कुत्सित हसायचास मला
पण माझंही लग्न झालंच मागनं

परधर्मीय होती ती म्हणून आला नाहीस लग्नासही
तुला समाज आड आला
तेव्हाही मी म्हणालो होतो हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || ४ ||

तुमचं कधीच झालं नाही भांडण
आमच्या घरात माजायचं रण
तुझी बायको सती सावित्री
आमच्याकडे सतत रागावून माहेरपण

दर वेळी आणायचो परत असेल ती कितीही निग्रही
तुला अजब वाटेल
कारण म्हंटलं ना तुला की हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || ५ ||

प्रेमात हरण्याची तुला भीती
म्हणून प्रेमात पडण्याचीच तुला भीती
भांडणाच्या फोडणीनेच होतं प्रेम खमंग
प्रेमाची ओंजळ तुझी नेहमीच राहील रीती

जाणतो मी ती किती तळमळते नेहमी माझ्या विरही
अरे तू क्या जाने
मी म्हणतो तेच खरं की हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || ६ ||

पितात त्यांनाच कळतं नशा काय असते
पिऊन धडपडण्यातही मजा काय असते
मसाल्याचं दूध पिऊन कसं तुला कळणार
प्रेमात फटकारणा-यांची अदा काय असते

आयुष्यभर मैत्री केलीस तरी हे समजला नाहीस अजूनही
अरे सोड ना रे
म्हणूनच आजही म्हणतो की हाय कंबख्त तू ने तो कभी पी ही नही || ७ ||

शेअर करा
61

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

8 Comments

  1. शशांक भालकर म्हणतो आहे:
    ऑगस्ट 2, 2019 येथे 10:53 AM

    खूप छान कविता

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      ऑगस्ट 8, 2019 येथे 12:34 PM

      धन्यवाद शशांकजी..

      उत्तर
  2. अवधुत कामत म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2018 येथे 9:17 AM

    खुपच छान तुझ्या तलख बुघ्दीमत्तेला माझा सलाम,देवतुला अशीच नवनविन काव्य लिहीण्यास स्फुर्ती देवो आणी आम्हा वाचकांना ते वाचण्यास सदैव मिळो

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 14, 2018 येथे 10:23 AM

      आभारी आहे…

      उत्तर
  3. Renuka varde म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 3, 2018 येथे 3:31 AM

    Tu ne to kabhi pi hi nahi… Wah sandeep wah well written

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 3, 2018 येथे 6:57 PM

      धन्यवाद रेणू.

      उत्तर
  4. नरेंद्र कदम म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 1, 2018 येथे 12:03 AM

    झकास कविता, संदीप

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 1, 2018 येथे 1:03 AM

      मनःपूर्वक आभार, नरेंद्र…

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो