logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
बदलू नकोस
फेब्रुवारी 4, 2011
शेवटची भेट
जानेवारी 20, 2012
तिची आणि माझी भेट
जून 17, 2011
काही दिवसांपूर्वी मला लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्याची एकदा नाही तर दोनदा संधी मिळाली. लग्नाला पन्नास वर्षं होणं म्हणजे समजुतदारपणा आणि आरोग्य ह्यांचा दुर्मिळ संगम. पन्नास वर्षांपूर्वी जग कसं होतं ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षं म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे ते लक्षात येईल. सादर आहे ह्याच विचारांवर बनलेली एक कविता ‘तिची आणि माझी भेट’.

भारताला स्वातंत्य्र मिळून केवळ चौदा वर्ष झाली होती
राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि देशावर नेहरूंच्या कॉंग्रेसची सत्ता होती
बांग्लादेशवर पाकिस्तान तर गोवा, दमण, दीववर पोर्तुगिजांची पकड होती
हिंदी चीनी भार्इ भार्इ होते अशी आपल्या सरकारची खात्री होती
जेव्हा मुंबर्इ उर्वरित महाराष्ट्रापासून विभक्त होती
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || १ ||

नरी कान्टॅ्रक्टर होता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
पुलंची अपूर्वार्इ आणि गणगोत ही पुस्तकं लोकप्रिय झाली होती फार
मुघल-ए-आझमच्या भव्यतेने लोक वेडे झाले होते पार
लताचं अल्ला तेरो नाम रेडिओवर वाजत आणि गाजत होतं सातही वार
जेव्हा दिलिप वेंगसरकरचं वय होतं वर्ष फक्त चार
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || २ ||

जगाच्या लोकसंख्येचा आकडा चार अब्जांवर गेला
त्यातच एक म्हणून बराक ओबामा जन्माला आला
पूर्व पश्चिम जर्मनीतील संबंधांवर आला बर्लिनच्या भिंतीचा घाला
विम्बल्डनमध्ये होता रॉड लेवरचा बोलबाला
जेव्हा युरी गागारीनच्या रूपाने मानव अंतराळात निघाला
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || ३ ||

दोन आण्यात हवं तिकडे जायला मुंबर्इत फिरत होती ट्राम
ऐंशी पैशात मिळायचा टॅक्सीने फिरण्याचा आराम
एकशे दहा रूपये दर तोळा होतं सोन्याचं दाम
वीस रूपयांत भारी साडी तर नव्वद रूपयांत आटपायचं शालूचं काम
जेव्हा तिच्याबरोबर हॉटेलात जायला आठ आण्यांपेक्षा लागत नसे एक छदाम
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || ४ ||

कॅमेरा नव्हता आमच्याकडे, फोटोकरता स्टुडिओत जाणं हा एकच उपाय
पोस्टकार्डाकरता इमेल आणि एसेमेससारखे आले नव्हते पर्याय
रेडिओ सिलोन ऐकण्याकरताही शेजारच्या घराकडे वळायचे पाय
म्युजिक सिस्टिम, कॉम्प्युटर, मोबाइल असलं काहीच नव्हतं हाय फाय
जेव्हा टीवीबद्दल बोललं तर लोक विचारायचे ते असतं तरी काय
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || ५ ||

तिने कधी सांगितलं नाही, पण तयार होतो तिच्याकरता तोडून आणायला नभीचे तारे
चालण्यात तारूण्याचा जोश होता वाटेत जरी आले पेटते निखारे
जगाची काळजी करायला तेव्हा हयात होते सारे वडिलधारे
आत्मविश्वासाची किल्ली होती उघडायला प्राक्तनाची दारे
जेव्हा मी पाठ फिरवीन त्या दिशेला वाहायचे वारे
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || ६ ||

त्या दिवशी अग्नीच्या साक्षीने वचनं दिली, भरवले एकमेकांना घास
सज्ज झालो पचवायला सुखाचा आनंद आणि दु:खाचा त्रास
कुटुंबाचं सुख, मनाशी ठेवला होता एकच ध्यास
आज मन भरून येतंय आठवून एवढा मोठा प्रवास
जेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं मिळेल एवढा सुखाचा सहवास
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी || ७ ||

काही अभिप्राय

  • जयंत कुंटे
    झकासच! नेहेमीप्रमाणे...
    जयंत कुंटे
    १७.०६.२०११
शेअर करा
48

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो