logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
जाणार नाहीस ना
ऑक्टोबर 3, 2014
आठव
सप्टेंबर 18, 2015
ओळख
फेब्रुवारी 20, 2015
नवरसांतील (खाजगीत) सर्वात जास्त आवडणारा रस म्हणजे शृंगार रस. आणि मराठी भाषेत शृंगार रस म्हटलं की लावणीला पर्याय नाही . . .

नाही सुटणार आता अबोला
तुम्हा ओळखलंय मी राया
जरी केलीत लाडीगोडी
जरी पडलात माझ्या पाया || धृ ||

पहिल्या दिशी नजर भेटली
जशी आग मनी चेतली
तुमची प्रित अचुक हेरली

तुम्ही तन मी तुमची छाया
तुम्हा ओळखलंय मी राया || १ ||

डोळ्यामध्ये सुरेची झिंग
ओठ डाळिंबीचा रंग
सारं भरलं ज्वानीनं अंग

तरी जाता काम कराया
तुम्हा ओळखलंय मी राया || २ ||

तुम्हासाठी केला शिणगार
वाट बघत झाला अंधार
तुमच्या मनात तिचे विचार

मन धावे तिकडं जाया
तुम्हा ओळखलंय मी राया || ३ ||

किती असाल तुम्ही दिलेर
जा किती फिरा बाहेर
याल परतुनी इथे अखेर

करी जादू अशी ही काया
तुम्हा ओळखलंय मी राया || ४ ||

सतवायची तुमची खोड
घास लागत नाही गोड
चांगली सुचली मजला तोड

तुम्हा लावीन परत फिराया
तुम्हा ओळखलंय मी राया || ५ ||

नाही सुटणार आता अबोला
तुम्हा ओळखलंय मी राया
जरी केलीत लाडीगोडी
जरी पडलात माझ्या पाया || धृ ||

शेअर करा
32

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो