logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
बदलू नकोस
फेब्रुवारी 4, 2011
एकच मजला सांग …
फेब्रुवारी 4, 2011
स्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं …

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
नटवतेस का शॄंगाराने तुझं अंगप्रत्यांग || धॄ ||

नट्टापट्टा करणं म्हणजे काम नव्हे वरवरचं
शक्ती पैसा वेळ सारं कितीक होतं खर्च
ठाऊक आहे तुलाही सारं करणार नाहीस कबूल
पाहतो मी जेव्हा तुजला ते होतं सारं वसूल

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
माझ्या ह्मा उपकारांचे तू कसे फेडशील पांग || १ ||

मी वाटेने चालत असता येशी तू सामोरी
नजर तुझ्यावर रेंगाळे मज कशास वाटे चोरी
दिधले मज देवाने चक्षु मूर्ती तुझी मी पाही
डोळे मिटून घ्यावे माझे इतुकी कुरूप नाही

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
निघता घरून तुला टाळण्या पाहू का पंचांग || २ ||

निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग || ३ ||

माझं बघणं अशिष्ट वाटून तुझ्या मनाला सलतं
पाहतो पण मी तुझ्याकडे हे तुला कसं गं कळतं
ठाऊक आहे सारं मजला राग तुझा हा लटका
दिसलो नाही दोन दिवस तर मोजत बसशी घटका

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
निरखतेस ना तू मज जेव्हा खास पाडतो भांग || ४ ||

तुला पाहतो प्रेमामधलं पाऊल पहिलं फक्त
दुसरं पाऊल टाकीन लवकर येर्इल माझा वख्त
त्यावेळी मग थेट बघीन मी डोळ्या भिडवून डोळा
पळवून लावीन तुझ्यातला हा भाव भाबडा भोळा

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
येशील का गं संगे तरण्या जीवनसिंधू अथांग || ५ ||

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
नटवतेस का शॄंगाराने तुझं अंगप्रत्यांग || धॄ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो