logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
ओळख
फेब्रुवारी 20, 2015
तू ने तो कभी पी ही नही
जानेवारी 6, 2017
आठव
सप्टेंबर 18, 2015
‘अतिपरिचयात अवज्ञा . . .’ असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण ‘आपलं माणूस’ म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी . . .

कधी दाटून येती मेघ
नभी दिसे विजेची रेघ
पवनही वाढवी वेग
मज येर्इ तुझा आठव || १ ||

कधी फुलांस येर्इ बहर
गुंजारव करती भ्रमर
फुलपाखरू ते सुंदर
मज येर्इ तुझा आठव || २ ||

कधी कानावर ये तान
विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
मज येर्इ तुझा आठव || ३ ||

कधी चंद्र दिसे अंबरी
नभ तार्‍यांनी भरजरी
प्रतिबिंब उठे सागरी
मज येर्इ तुझा आठव || ४ ||

कधी नयन कुणाचे दिसती
कधी ओठ कुणाचे हसती
कधी गाल कुणाचे रूसती
मज येर्इ तुझा आठव || ५ ||

कुणी सारी केस बोटाने
अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
मज येर्इ तुझा आठव || ६ ||

कुणी नेसली हिरवी साडी
चष्म्याची रंगीत काडी
खांद्यास पर्स राखाडी
मज येर्इ तुझा आठव || ७ ||

कधी नेहमीचे हॉटेल
गाडीची एकच वेळ
तो चित्रपटाचा खेळ
मज येर्इ तुझा आठव || ८ ||

कधी मन होतसे अशांत
गर्दीतही मज एकांत
वदण्याची गरज नितांत
मज येर्इ तुझा आठव || ९ ||

हल्ली तुजला मी पाहे
मनी एकच किंतु राहे
सखी जुनी कुठे ती आहे
मज येर्इ तुझा आठव || १० ||

शेअर करा
49

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...

8 Comments

  1. Praful म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2018 येथे 11:35 PM

    वा वा छान कविताkeep it up Sandeep …Praful

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 15, 2018 येथे 9:09 AM

      धन्यवाद प्रफुल्ल…

      उत्तर
  2. श्रीपाद सहस्रबुद्धे म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2018 येथे 4:27 PM

    ‘आठव’
    कविता मस्तच आहे.
    स्मरणात साठवलेले बरेच ‘आठव’ कवितेत आले आहेत.
    छान.

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 14, 2018 येथे 7:34 PM

      धन्यवाद…. प्रेमाचा अर्थ समजायला बरेच पावसाळे जावे लागतात.

      उत्तर
  3. Mukta म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2018 येथे 10:34 AM

    Khup chan

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 14, 2018 येथे 11:13 AM

      धन्यवाद मुक्ता …

      उत्तर
  4. Madhavi Shinde म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2018 येथे 9:26 AM

    Khup sundar

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 14, 2018 येथे 10:24 AM

      मनःपूर्वक आभार…

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • तुळस जून 5, 2023
  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो