![](https://navanirmiti.in/nirmiti/wp-content/uploads/2019/07/Gur.jpg)
गुर
जुलै 1, 2019![](https://navanirmiti.in/nirmiti/wp-content/uploads/2019/09/Samaj.jpg)
समज
सप्टेंबर 5, 2019दान
![](https://navanirmiti.in/nirmiti/wp-content/uploads/2019/08/IMG_20150712_113206_edit-1200x480.jpg)
आज राष्ट्रीय इंद्रिय-दान दिवस आहे. आपल्यातील प्रत्येकाचं स्वतःवर प्रेम असतं. पण स्वतः म्हणजे नक्की कोण? थोडं समजण्याचं वय झालं की आपल्याला सांगितलं जातं आरशासमोर उभं राहिलं की समोर जे दिसतं तो किंवा ती तू स्वतः आहेस. मग मी म्हणजे माझं शरीर ह्या विचाराची घट्ट वीण आपल्या मनात बसते. स्वतःवर प्रेम करण्याला काही सीमा नाहीत. आपलं प्रेम इतक्या थराला जातं की माझं स्वतःचं अस्तित्व नष्ट झालं तरी माझं शरीर कोणाला द्यावं हा विचार मनाला पटत नाही. खरं आहे ना?!
स्टेशनवर बसलो होतो, बराच वेळ होता अजून गाडी यायला
शांतपणे बॅगेतून माझं पुस्तक काढून लागलो मी वाचायला ॥
पुस्तकातील विनोद वाचून माझ्या नकळत मला हसू एकदम आलं
माझ्या शेजारी बसलेला एक लहान मुलगा मला म्हणाला, काका काय झालं? ॥
तोपर्यंत माझ्या शेजारी कुणी बसलंय ह्याचा मला जराही नव्हता गंध
नीट पाहिलं तेव्हा कळलं, तो लहानगा होता दोन्ही डोळ्यांनी अंध ॥
म्हणाला एवढं कसलं हसू आलं तुम्हाला सांगा ना जरा मला
मीही मग पुस्तक उघडून त्यातील विनोद त्याला वाचून दाखवला ॥
ऐकून मनसोक्त हसला तो आपल्या निकामी डोळ्यांत पाणी आणून
मलाही हसू आवरेना त्याचा तो निखळ, निरागस आनंद पाहून ॥
असाच थोडा वेळ गेला आणि तो म्हणाला वळवून माझ्याकडे चेहेरा
तुमचं झालं की मीही वाचू शकेन मला द्याल का जरा? ॥
पटकन विचारून गेलो त्याला जिभेवर राहिला नाही ताबा
देईन की पुस्तक तुला पण तू वाचणार कसा आहेस रे बाबा? ॥
जीभ चावली माझी पण त्याच्या चेहेऱ्यावर भाव होते भोळे
पुस्तक घेईन नवीन मी पण वापरून झाल्यावर द्याल का मला तुमचे डोळे? ॥
त्या दिवशी गळून पडला माझ्या मनातील साऱ्या भ्रामक समजुतींचा मान
गाठ बांधली मनाशी नेत्रदान श्रेष्ठदान! ॥