घटस्थापना / नवरात्री
डिसेंबर 17, 2021ईद-ए-मिलाद
डिसेंबर 17, 2021दसरा
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/DENFmRiQa78 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
अश्विन मासी शुद्ध दशमीस येई दसरा सण
दुर्गेने केले ह्या दिवशी महिषासुरमर्दन
ह्याच दिवशी श्रीराम मारितो असुरराज रावण
म्हणूनच दसऱ्याचा सण होतो ह्या दिवशी साजरा ॥
पांडवबंधू येती संपवूनी वर्ष अज्ञातवास
सिमोल्लंघनासाठी ठेविला राखून दिन हा खास
शमिवृक्षाची पाने लुटुनी श्रीखंड खावे ठास
अशा प्रकारे दसऱ्याचा सण होतो मग साजरा ॥