खिडकी
डिसेंबर 4, 2024चविताक
सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?
चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
चह्या चषेलाभा चहीना चवगा
चह्या चषेतभा चहीना चणीगा
चह्या चषेलाभा चहीना चकरणव्या
चह्या चषेतभा चहीना चपारव्या
चही चषाभा चलतेबो चक्तफ चलकांचीबा चती चळीटो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
चळेतीलशा चंकेतिकसा चषाभा
चपरूनवा चळाखे चंडाभा
चमच्याआ चळीतटो चरायलाशि
चषाभा चगायचीला चकायलाशि
चर्गातव चपरावा चरायलामा चणालाकु चमणाटो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
चझ्यामा चरीघ चलतानाबो
चत्रमि चसेचअ चलायचेबो
चयकोहीबा चगम चकलीशि
चणिआ चशिमा चंकलीशि
चताआ चलासमोरमु चपरतोवा चहानल चहेआ चवरतो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
चंगतर चसतीलन चप्पाग
चरत चपरावा चही चम्मतग
चरकुंडीमु चळेलव चसूनह
चंटाळाक चईलजा चरवूनह
चस्यहा चनोदवि चंवाकि चसेलअ चणालाकु चचणंटो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
अशी एक भाषा आहे तिला नाही तोड
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥
ह्या भाषेला नाही गाव
ह्या भाषेत नाही गाणी
ह्या भाषेला नाही व्याकरण
ह्या भाषेत नाही व्यापार
ही भाषा बोलते फक्त बालकांची ती टोळी
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥
शाळेतील सांकेतिक भाषा
वापरून खेळा भांडा
आमच्या टोळीत शिरायला
भाषा लागायची शिकायला
वर्गात वापरा मारायला कुणाला टोमणा
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥
माझ्या घरी बोलताना
मित्र असेच बोलायचे
बायकोही मग शिकली
आणि माशी शिंकली
आता मुलासमोर वापरतो लहान आहे तोवर
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥
रंगत नसतील गप्पा
तर वापरा ही गंमत
मुरकुंडी वळेल हसून
कंटाळा जाईल हरवून
हास्य विनोद किंवा असेल कुणाला टोचणं
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥
अशी एक भाषा आहे तिला नाही तोड
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥