देव बसला वर ..
डिसेंबर 1, 2021रामनवमी
डिसेंबर 16, 2021गुढीपाडवा
नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जेव्हा येते चैत्राच्या महिन्यात शुद्ध प्रतिपदा
विजय होई सत्याचा जाती टळून साऱ्या विपदा
गुढी नवीन वर्षाची दावी भावी सुखसंपदा
गुढीपाडव्याचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥
ब्रह्मदेव ज्या दिवशी करतो समयाची सुरूवात
रामचंद्र बनले ह्या दिवशी अवधेचे सम्राट
शालिवाहनांनी अन् केली शकांच्यावरी मात
गुढीपाडव्याचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥