हरतालिका
डिसेंबर 17, 2021अनंत चतुर्दशी
डिसेंबर 17, 2021गणेशोत्सव
गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Adq10PA1G2I ह्या ठिकाणी ऐकता येईल.
भाद्रपदाच्या मासी येते जेव्हा शुद्ध चतुर्थी
महाराष्ट्राच्या घराघरातून वसते मंगलमूर्ती
आबालवृद्धांना हे बाप्पा भुरळ घालती पुरती
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥
एकवीस अकरा सात दीड अन् कुठे वसे दिन पाच
मराठमोळ्या मनामधील जो आद्यदेव तो हाच
कुठे बसुनिया खातो मोदक कुठे रंगी करी नाच
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥
काढती लोकसंघटन करण्या लोकमान्य ही तोड
पुराणास मग इतिहासाची अशी मिळाली जोड
समाज झाला एकत्रित अन् सण झाला हा गोड
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥
रोज चालते पूजन गणपती बाप्पाला मोरया
विसर्जनाला वाटे वाईट निरोप अन् द्यावया
अश्रूपूर्ण डोळे म्हणती पुढल्या वर्षी लवकर या
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥