logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
रफू
नोव्हेंबर 18, 2011
सट्टा
जुलै 6, 2012
बी पी
जानेवारी 4, 2012
रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर किंवा बीपी हा धकाधकीच्या शहरी जीवनाने आपल्याला दिलेला शाप आहे. कोणत्याही वाईट सवयी शेवटी रक्तदाबाला आमंत्रण देणाऱ्या ठरतात. रक्तदाबाला कारणं अनेक पण विचार करा की ही सारी कारणं एकाच व्यक्तीच्या वाट्याला आली तर …?!

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/DkiShkgFsSg ह्या ठिकाणी ऐकता येईल.

डाॅक्टर मला विचारत होते झालंय तरी काय
कसलं एवढं टेन्शन घेता बी पी झालंय हाय || धॄ ||

काय सांगू त्या दिवशी मी घरी होतो जात
सिग्नलपाशी सुंदर युवती दाखवत होती हात
सोडाल का हो घरी माझ्या उशीर झालाय खूप
प्रश्न ऐकला गाडीमध्ये घेतलं तिजला आत

बोलती बंद झाली माझी मी तर भलताच शाय
देखणं रूप पाहून माझं बी पी झालं हाय || १ ||

काय बोेलू ते समजत नव्हतं माझ्यावर मी कृद्ध
विचार करत होतो एवढ्यात तीच बोलली खुद्द
चक्कर येतेय मला आणखी होर्इल वाटे उलटी
एवढं बोलून माझ्याशी ती झाली की बेशुद्ध

घेऊन गेलो हाॅस्पिटलला होता तोच उपाय
पाहून तिची अवस्था माझं बी पी झालं हाय || २ ||

अभिनंदन ही बनेल आर्इ तीस आठवडे थांबा
ऐकूनी डाॅक्टरचे हे म्हणणे सुटला माझा ताबा
गोंधळलेला मी असताना शुद्धीवर ती आली
दावूनी अंगुली मला म्हणाली तुम्ही मुलाचे बाबा

डाॅक्टर सारे बघती माझे लटपटती अन् पाय
चेहेरे पाहून त्यांचे माझं बी पी झालं हाय || ३ ||

समजावत मी असताना पण आले तेथे पोलीस
भांबावूनी मी गेलो झालो परिस्थितीचा ओलीस
जबाब घेती माझा दरडावुनिया माझ्यावरती
उत्तर नव्हते माझ्यापाशी हडेलहप्पी बोलीस

पाहून एकेकाचे चेहरे झालो गोगलगाय
भविष्य वाटे काळं माझं बी पी झालं हाय || ४ ||

माझ्यावरती केल्या गेल्या मेडिकल टेस्ट्स काही
रिपोर्ट आला पोलीस माझ्याकडे दयेने पाही
दोषी नाही तुम्ही सांगे रिपोर्ट आम्हा पाहा
कधीच तुम्ही पिता कुणाचे होणे शक्य नाही

कानी पडता बोल तयाचे आठवली मज माय
समजून येता शब्द माझं बी पी झालं हाय || ५ ||

सुटलो होतो संकटातुनी गोष्ट होती मोठी
व्यंग आपुले जाणून मात्र ढवळत होते पोटी
ह्मा साऱ्यावर ताण मनाला येता एक विचार
आली कोठून घरात माझ्या दोन मुलं ती छोटी

घामाने मग भिजून गेला शर्ट आणखी टाय
स्मरूनी सारे मित्र माझं बी पी झालं हाय || ६ ||

काय सांगू डाॅक्टर पुसती झालंय तरी काय
कसलं एवढं टेन्शन घेता बी पी झालंय हाय || धॄ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो