logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
बायकोचा मित्र
ऑगस्ट 21, 2015
माकड आणि माणूस
डिसेंबर 18, 2015
पोटचा गोळा
डिसेंबर 4, 2015
“परत मुलगीच झाली . . . अरेरे!” हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का?

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.

गावातील त्या इस्पितळाची जुनी इमारत होती
चौथ्या वेळी इस्पितळी ती भरती झाली होती || १ ||

जमीन जुमला शेती वाडी प्रस्थ बडं सासरचं
पण दर वेळी बाळंतीणीचा माहेरच्यांनाच खर्च || २ ||

माहेरी पैशाची होती परिस्थिती गंभीर
पण तिच्यामागुती उभा ठाकला भाऊ तिचा खंबीर || ३ ||

होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती
कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती || ४ ||

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक
दुसर्‍या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक || ५ ||

तिसर्‍या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी
आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी || ६ ||

एकच बुळा दीर वंश पण चालायला तर हवा
तिलाच देणं भाग होतं वंशाला त्या दिवा || ७ ||

सासर होतं गप्प तरीही तिला होतं माहीत
मुलगी आता झाली असता नांदवणार नाहीत || ८ ||

व्हायचं ते काही चुकलं नाही मुलगीच झाली पुन्हा
काळवंडून ती गेली जैसा तिचा असावा गुन्हा || ९ ||

भावाला त्या बघवत नव्हती धास्तावलेली बहीण
त्याच्या ओळखीमध्ये होती इस्पितळातील सुर्इण || १० ||

तिथेच आणखीन एक जीव जगात आला होता
शेजारच्या पहिलटकरणीला मुलगा झाला होता || ११ ||

भावाने मग सुर्इणीला त्या रक्कम दिली चांगली
गुपचुप केली तिने मुलांची रात्री अदलाबदली || १२ ||

पाप आहे हे तर नव्हतं तिला पटत बिलकुल
पण मुलींकरता होऊन अगतिक झाली ती कबूल || १३ ||

पहिलटकरीणच होती तिजला होतील मुलं अजून
लाडच होतील ह्मा कन्येचे पहिली बेटी म्हणून || १४ ||

तिच्या सासरी आलं होतं आनंदाचं उधाण
कौतुक करणार्‍यांना काही राहिलं नव्हतं भान || १५ ||

दुसर्‍या दिवशी तिला मुलीचं रडणं ऐकू आलं
समजत नव्हतं तिला माझ्या छकुलीस काय झालं || १६ ||

तिचं दुध पिऊन झोपला कोण कुणाचा तान्हा
रडणं ऐकून लेकीचं पण आटत नव्हता पान्हा || १७ ||

उठली तशा अवस्थेतही ती झालं काय पाहाया
कुणीही तयार नव्हतं मुलीला जवळ अपुल्या घ्याया || १८ ||

राहवलं नाही माऊलीस जाऊन विचारलं
उत्तर ऐकून मात्र तिथे तिज रडूच कोसळलं || १९ ||

होता एक चांडाळ ज्याने तिला फसवली होती
लग्नाआधीच पापाची त्या खूण प्रसवली होती || २० ||

काय करावं हिचं कधीचा विचार आम्ही करतोय
अनाथाश्रमात होते म्हणती अशा मुलांची सोय || २२ ||

अंधारच जणू मनी पसरला उदय शतश: विद्ध
मट्कन खाली बसली ती अन् तिची हरपली शुद्ध || २२ ||

दोन दिसांनी शुद्धीवर ती आली कशीबशी
मुलगी गेली होती तोवर झाली वेडीपिशी || २३ ||

भावाने मग प्रयत्न केला शोध घेण्याचा
पण योग नव्हता पुन्हा मुलीचा चेहरा बघण्याचा || २४ ||

चार मुलांना घेऊन आजही झुरते तोळा तोळा
विचार करते असेल कसा हो माझ्या पोटचा गोळा || २५ ||

लोक आजही प्रयत्न करती शोधाया कारणं
भाऊच फक्त जाणतो का पण तिचं हरवलं हसणं || २६ ||

कालबाह्म ह्मा प्रथा रूढींची असली कसली दीक्षा
कोणाची ही असे विकृती भोगी कोण अन् शिक्षा || २७ ||

शेअर करा
69

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो