logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
श्रद्धा
जानेवारी 20, 2017
उपदेश
एप्रिल 7, 2018
पेराल तसे उगवेल
फेब्रुवारी 3, 2017
निवडणुका येत आहेत. ‘पेराल तसे उगवेल’ ही उक्ती निवडणुकीतील मतदानाइतकी दुसऱ्या कशालाही चपखल बसत नसेल. तेव्हा सावधान! ह्या म्हणीला साजेशी एक छोटीशी काव्यकथा सादर करत आहे . . .

येता महिन्याचा पुन्हा तो एक विशिष्ट वार
शेतकर्‍याने नेहेमीसारखा गाठला मग बाजार
महिनाभर केली जी ती मेहेनत फळण्याकरता
केवळ आजच्या दिवसाचा असे त्यास आधार

आला कच्च्या रस्त्याची खात सगळी धूळ
कमार्इचं होतं त्याच्या केवळ एकच मूळ
बनवत असे महिनाभर सतत करून कष्ट
ताजा शुद्ध सोनेरी साखरेसारखा गूळ

जायचं होतं परत लांब होती त्याला घार्इ
महिनाभर चालवायची होती आजची कमार्इ
धान्य भाज्या भांडी कपडे मुलांसाठी खेळ
घरी वाट पाहती मुलं आणि त्यांची आर्इ

गूळ दुकानात विकायला त्याने गाठली पेठ
त्याला बघून बाहेर आला दुकानातला शेठ
चेहेर्‍यावर संताप त्याच्या मावता मावत नव्हता
येऊन शेतकर्‍याची त्याने मानगूट धरली थेट

संशय आला होता मला पूर्वीच्या खेपेला
शेराला दहा तोळे कमी गुळाच्या ढेपेला
बरा सापडलास आता तुला सोडणार नाही मी
कोतवालाला बोलावतो तू जा जन्मठेपेला

शेतकरी रडत शेठच्या पाया पडला त्या
मालक माझं बोलणं जरा ऐकून तरी घ्या
नाही पटलं जर मी काय सांगतो ते तुम्हाला
तर मला खुशाल कोतवालाच्या ताब्यात द्या

मी गरीब कुठून आणू वजनाचा तो काटा
म्हणून जेव्हा येत असतो इकडे बाजारहाटा
नेतो तुम्ही मोजून देता शेर शेर धान्य
तेच वजन वापरून करतो गुळाचा मी वाटा

शेठ दुकानात जाऊन मान खाली घालून बसला
शेतकर्‍याचा शब्द त्याला नागासारखा डसला
आपलेच दात आपलेच ओठ सांगणार तरी कोणाला
पेराल तसे उगवेल ह्मावर विश्वास त्याचा बसला

शेअर करा
99

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

2 Comments

  1. मनीषा चांदूरकर म्हणतो आहे:
    सप्टेंबर 5, 2018 येथे 9:52 AM

    सगळ्या कविता खूप खूप सुंदर अर्थपूर्ण

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      सप्टेंबर 5, 2018 येथे 10:14 AM

      मनःपूर्वक धन्यवाद, मनीषा…

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो