logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
दीर्घायुषी राजा
मे 2, 2014
वीज
नोव्हेंबर 7, 2014
पाप
जुलै 4, 2014
पाप-पुण्याची अध्यात्मिक चर्चा ऐकायची असेल तर स्मशानासारखी जागा नाही. मरणाची अपरिहार्यता नजरेसमोर उभी ठाकली की राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावनांचा फोलपणा जाणवू लागतो. मात्र स्मशानभूमीच्या बाहेर हे विचार जिवंत ठेवू शकणारा खरा योगी असतो!

संपून गेले प्रवचन स्वामी बसले होते स्वस्थ
भेटण्यास कुणी भाविक आला चेहरा त्याचा त्रस्त
स्वामीजींनी पुसले त्याला सांग मला तू मित्रा
काय किंतु तो छळतो तुजला का इतुका अस्वस्थ

विचारले त्याने स्वामींना पुण्य तुमचे अमाप
कधीच का तुम्ही केले नाही जीवनात ह्मा पाप || १ ||

निरखून बघती स्वामी चिंता चेहर्‍यावरती आली
माझे सोड अभाग्या लिहिले काय तुझिया कपाळी
तुझ्या जीवनी आता केवळ दिवस राहिले सात
स्पष्ट दिसतसे मजला ती मृत्यूची सावली काळी

भाविक तो दचकुनिया उठला जसा दिसावा साप
विसरूनी गेला प्रश्न स्वत:चा काय पुण्य अन् पाप || २ ||

सातव्या दिशी स्वामी गेले भेटावयास त्याला
व्याकूळ भावे पाय धरूनी तो स्वामींना म्हणाला
भले करावे माझे आता आशीर्वच मज द्यावे
काही नको मज बाकी दिसतो अंतसमय तो आला

स्वामीजींच्या पायी पडला भाविक तो अश्राप
स्वामीजींना आली कणव पाहून चेहरा निष्पाप || ३ ||

त्यास म्हणाले स्वामी गेल्या दिसांमध्ये ह्मा सात
कितीदा आले विचार वार्इट सांग तुझिया मनात
कितीदा मत्सर अन् मोहाने झाले मन बेचैन
कितीदा चावियलेस दात तू रागाच्या भरात

भाविक म्हणतो मृत्यू देतो दारावरती थाप
अशा समयी मी कसे आणावे मनात माझ्या पाप || ४ ||

हसून म्हणाले स्वामी उत्तर तूच दिले प्रश्नाचे
चिंतत नाही ह्माचकारणे वार्इट मी कोणाचे
येर्इल माझ्या मनात कैसा विचारही पापाचा
ठाऊक आहे मजला माझे भाकित ते मरणाचे

अवाक् झाला ऐकून भाविक लागे त्याला धाप
विचार करतो जगेन का मी केल्यावाचून पाप || ५ ||

शेअर करा
87

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो