logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
नरक
फेब्रुवारी 5, 2016
पीळ
जुलै 22, 2016
नव्याण्णववासी
मार्च 18, 2016
तीन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या बऱ्याच जणांना चार खोल्यांच्या घराची आस असते. त्याच वेळी काही जण दोन खोल्यांच्या घरातही सुखाने नांदतात. असण्या / नसण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला हा विसंवाद दिसून येतो. ह्याला कारण म्हणजे आपण बहुतेक सगळेच ‘नव्याण्णववासी’ आहोत . . .

राजा होता एक
स्वामींपाशी आला
होता मोठा नेक
पण दुःखी होता झाला || १ ||

माझ्यापाशी छान
सुखसंपत्ती सारी
तरीही समाधान
नाही मनाच्या दारी || २ ||

सेवक माझे काही
असती ते निर्धन
तरीही रोज मी पाही
सुखी तयांचे मन || ३ ||

स्वामी थोडे हसले
हळूच आपल्या गाली
राजासमोर बसले
नजर तयाच्या भाळी || ४ ||

चिंता तुझ्या मनाशी
आहे त्याच्या मागे
तू नव्याण्णववासी
कारण आहे साधे || ५ ||

अबोध पाहून वदन
स्वामी म्हणाले थांब
देईन उदाहरण
जवळच नाही लांब || ६ ||

राजाच्या उद्यानी
एक पाणक्या होता
नव्हता त्याच्या ध्यानी
दारिद्र्याचा तोटा || ७ ||

आणत असे तो पाणी
दूर वाहतो ओढा
म्हणत असे अन् गाणी
मार्ग कठीण जरी थोडा || ८ ||

स्वामींनी त्या जागी
युक्ती केली कसली
पाणक्यास त्या मार्गी
सुवर्णनाणी दिसली || ९ ||

पाहत कोणी नाही
करून पूर्ण खातरी
घेऊन नाणी जाई
मोजे अन् रातरी || १० ||

धनामुळे त्या किंतु
उरला ना अंतरी
चुकले काही परंतु
एक कमी शंभरी || ११ ||

धनिक जाहलो आता
मनात जरी तो जाणे
तरीही सलतो काटा
एक कमी का नाणे || १२ ||

त्या दिवसापासूनी
दुःखी पाणक्या झाला
गेला तो विसरुनी
गाणेही म्हणण्याला || १३ ||

थांबवून मग काम
नाणे तो शोधतो
जीवनात ना राम
रोज मनाशी म्हणतो || १४ ||

बघ ही अजब कहाणी
स्वामी म्हणती राजाला
नव्याण्णव ती नाणी
पुरती जरी जन्माला || १५ ||

पडतो प्रश्न मनास
एक कमी का नाणे
दुःखाचा तो भास
बिघडे जीवनगाणे || १६ ||

तुही त्याचप्रमाणे
बघ नव्याण्णववासी
असती जरी मणाने
संपत्तीच्या राशी || १७ ||

राजाला समजला
चिंतेचा त्या ठाव
धनाढ्य जरी तो असला
गेली नव्हती हाव || १८ ||

वदला तेथ करुनी
स्वामींचा सन्मान
करीन आजपासुनी
संपत्तीचे दान || १९ ||

शेअर करा
4

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो